सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान
कृष्णानगर येथील शहीद परिवाराकडून अनोखा उपक्रम
(वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना मदत)
सावळी सदोबा:- आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परीसरातील कृष्णानगर येथील शहीद ज्ञानेश्वर आडे,यांचे चिरंजीव उमाकांत आडे यांचा आज वाढदिवस असल्याने, आपल्या मुलांच्या वाढदिवसावर कोणताही अगाऊ खर्च न करता, चांगला उपक्रम राबवुन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलाय,साध्या आणि सोप्या पद्धतीने वाढदिवस साजरा करुन,आपलं सामाजिक दायित्व समजून मौजा माळेगांव येथिल अतिशय गरीब कुटुंबातील संतोष चव्हाण व पत्नी गीताबाई चव्हाण यांच्या काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांचे दोन्ही मुले अनाथ झाली असतांना,कृष्णानगर येथील शहीद विर पत्नी कुन्तीबाई आडे यांना अगदी साध्या पद्धतीने आपल्या मुलांचा वाढदिवस अनाथ मुलां सोबत त्यांच्या घरी जाऊन साजरा केलाय,दोन्ही अनाथ मुलांना व त्यांच्या वयोवृद्ध असलेला आजीबाईला कपडे व आर्थिक मदत देऊन,दोन्ही अनाथ मुलांचा पुढील शैक्षणिक खर्च उचलणार असल्याचे सांगितले,यावेळी उपस्थित मा.बाळासाहेब शिंदे,विजय राऊत,कीसन चव्हाण,नारायण जाधव,नामदेव चव्हाण (टेलर)राजू चव्हाण,अहेमद तंवर,यादवराव राठोड,नुनेश्वर आडे,अविनाश चव्हाण,रामराव राठोड,ईद्रसिंग चव्हाण,अजिस खान,गणेश बढीये,अविनाश डाखोरे,दुर्गादास राठोड,सुरेश राठोड,रमेश राठोड,अजित राठोड सह सावळी सदोबा परिसरातील तथा माळेगांव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
९ मार्च रोजी आयता येते घरगुती गॅसच्या आगीमुळे गुदमरून मृत्यू झालेल्या जयस्वाल कुटुंबीयांना सुद्धा शहीद परिवाराकडून २५,०००हजार रूपये आर्थिक मदत देण्यात आली
