Home यवतमाळ श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा सोळावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा सोळावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

11

श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा सोळावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

देवदत्त श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा सोळावा वर्धापन दिनानिमित्त १५ मार्च ला सकाळी ५ वाजता पासून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे प्रथम वर्धापन ज्ञान उत्सव व ज्ञान सत्र सोहळा थाळेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे यात मंगल स्नान,ध्वोजारोहन,उपहार महा आरती,ज्ञांसत्र इत्यादि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे धार्मिक कार्यक्रम संपताच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमात सद्भक्त किसनराव चौकोने हे ब्रम्ह विद्या तत्व ज्ञानानुसार स्वइच्छेने सन्यास धर्मात पदार्पण करीत आहे तरी या भव्य सोहळ्यास समस्त महानुभाव पंथाच्या समस्त सद्भक्तानी या सोहळ्यास उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक ई श्री महंत देवव्यासबाबा बिडकर व्यवस्थापक हंसराजदादा पंजाबी,गोविंद मुनी पंजाबी,कृष्णा बिडकर तपस्वीनी शिल्पा मेहकरकर यांनी केले आहे या सोहळ्यास अनेक संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Copyright ©