Home Breaking News *समाज माध्यमावर महादेवाचा नंदी पाणी व दुध पितोय चे अनेक व्हिडीओ*

*समाज माध्यमावर महादेवाचा नंदी पाणी व दुध पितोय चे अनेक व्हिडीओ*

16

सदानंद जाधव

२७ वर्षा पूर्वी म्हणजेच 1995 ला संपूर्ण भारत देशात गणपती मूर्ती दूध पितोय ची अफवा पसरल्याने संपूर्ण देशातील सर्व गणेश मंदिरात भाविकांच्या रांगाच -रांगा लागल्या होत्या. काल दिनांक ५ मार्च शनिवार रोजी चक्क २७ वर्षा नंतर अचानक कुठून कशी चर्चा सुरू झाली प्रथम नंदी ला पाणी व दूध कोणी पाजले हे जरी संशोधना चा विषय असला तरी ही अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने.भाविकांनी पाणी व दुध घेऊन शिव मंदिरा कडे धाव घेऊन नंदी ला पाणी व दुध पाजण्यास सुरवात केली. काही भाविकांनी तर आपल्या घरी पूजे साठी असलेल्या नंदीला पाणी व दूध पाजून पाहिले आणि त्याचे चित्रीकरण करून समाज माध्यमावन पाठवले .नंदीला दूध व पाणी पाजण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली यामध्ये विशेषतः महिला वर्गाचा जास्त समावेश दिसून आला. हा प्रकार श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा असू शकतो. तर हा चमत्कार असल्याचीही चर्चा सुरू होती. मात्र पाण्याचा चमच्या नंदीच्या तोंडाला लावला असता पाणी खाली न सांडता पाणी व दूध मुर्ती कडून प्यायले जात होते.

नंदीला पाणी पाजण्यासाठी भाविक महिला व पुरषांसह बालगोपाळांची मोठी गर्दी जमली होती.

सदर घटना हि श्रद्धेशी निगडित असून, नेमकी श्रद्धा व अंधश्रद्धा हे समजून घेणे आवश्यक असून या विषयावर अनेकांचे वेगवेगळे मत येत आहे

Copyright ©