Home Breaking News *डेयरी उद्योगाची पशुसंवर्धन आयुक्तांमार्फत पाहणी*

*डेयरी उद्योगाची पशुसंवर्धन आयुक्तांमार्फत पाहणी*

14

 

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पशुसंवर्धन आयुक्त तथा यवतमाळ जिल्हयाचे माजी जिल्हाधीकारी श्री एस. पी. सिंग यांनी नुकताच पशुसंवर्धन विभागाचा आढावा दौरा केला. दौर्या दरम्याण पशुसंवर्धन विभागाच्या विविध कार्यालयांना व संस्थांना भेटी देवून आढावा घेण्यात आला.
सकाळी बाभुळगाव तालुक्यातील भेटी दरम्याण तालुक्यातील प्रगतीशील एस. कुमार डेअरी उद्योगात अगदी दुग्धसंकलाचे वेळी भेट देवुन पशुपालक तथा दुग्धव्यवसायी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधुन आपुलकीने विचारपुस केली. याप्रसंगी त्यांचे स्वागत पशुवैद्यकीय दवाखाणा श्रेणी-१ येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक धुर्वे यांनी केले. डेअरीचे संचालक श्री. सुधाकरजी ठाकरे यांची मागील विस वर्षापासुन दुग्ध व्यवसायातील प्रगती व दुग्धप्रक्रीया उद्योगाचा प्रवास आयुक्तांनी यावेळी जाणुन घेतला व उद्योगाची पाहण केली. चहाच्या स्टॉलसाठी लागणाऱ्या दुधासाठी दोन म्हशी खरेदी करण्या पासुन ते आज कोटयावधींची वार्षीक उलाढाल व त्या सोबतच छोटया दुध उत्पादकांसाठी हक्काची बाजारपेठ म्हणुन आज बाभुळगावातील व्यावसायीक क्षेत्रात एस. कुमार डेअरी उद्योगाकडे बघीतले जाते.
सदर डेअरीवर दुध देणाऱ्या तालुक्यातील छोटया पशुपालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या राज्य केंद्र तसेच जिल्हा परिषदे मार्फत विविध योजना व सेवां बावत पंचायत समिती बाभुळगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ.प्र. रा. झाडे यांनी आयुक्त महोदयांना अवगत केले. नविन तांत्रीक ज्ञानाचा उपयोग करून मुरघास व सायलेज सारख्या पद्धतीने पहुंचा चारा साठवणुक करून ऊन्हाळयातही दुध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आयुक्तांनी मार्गदर्शपर सांगीतले. या मेटी प्रसंगी जिल्हा पशुसंर्धन उपायुक्त डॉ. गोहत्रे, जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, पशुसंर्धन सहआयक्त डॉ. अलोने, पशुधन विकास अधिकारी (तांत्रीक) डॉ. राजरत्न रायबोले तसेच मोठ्या संख्येने पशुपालक उपस्थीत होते.

Copyright ©