प्रती
घोटी येथील महानुभाव पंथाच्या श्री दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात प्रथम ध्वजारोहन मंगल स्नान, उटी,पारायण, नामस्मरण, उपहार आरती भजन आणि महाप्रसादा समवेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सालाबाद प्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमास अनेक संत महंत प्रामुख्याने उपस्थित होते.या महत्व पूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे सभा अध्यक्ष,प पू इ श्री हेमंतराज बाबा बांदकर,हे होते तर प. पू.इ .प्रदीपराज पंजाबी, प पू इ श्री पंकजराजदादा पंजाबी, प पू इ श्री देवव्यासबाबा बिडकर, प पू इ श्री उत्तमराजदादा येळमकर,प पू इ श्री प्रेमराज मुनी जामोदेकर, विशेष अतिथी म्हणून ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष,तथा पत्रकार शक्तीचे मुख्य संपादक ओंकार चेके इत्यादी संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे आयोजन वच्छलाआई चावरे तर गणेशराव चावरे यांनी केले
