सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान
आई-वडीलाच्या जाण्याने भारत ,बादल चे भविष्य अंधारात ,मदती साठी माणुसकी जपत पुढे येतील का हात
आर्णि तालुक्यातील मौजा माळेगांव येथील रहिवासी संतोष मोतीराम चव्हाण यांचे दिनांक सण २००६ मध्ये पळशी ता.घाटंजी येथील गीता राठोड हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर गीता व संतोष या नवदाम्पत्याला एक वर्षाने भारत व दुसऱ्या वर्षी बादल अशी दोन मुले झालीत,संतोष हा अशिक्षित त्यात परस्थिती खूप हालाखीची असल्याने रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता,पण एक दिवस अचानक संतोष यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने पत्नी गीता हिच्यावर एक प्रकारे संकटच कोसळले. पतीच्या जाण्याने एकाकी पडलेल्या गीता ला दोन्ही मुलांच्या भविष्याची चिंता सतावत होती.कमवता नवरा गेल्याने पत्नी गीतावर कुटुंबाचा भार पडला आपल्या दोन लहान मुलांना घेऊन मोलमजुरी करून सांभाळ करत असताना,अचानक गीता आजारी पडली खूपदा दवाखाना करून औषधी उपचार केले पण तिला पाहिजे तसा आराम मिळत नसल्याने ती आपल्या मुलांच्या उदरनिर्वाह साठी आजार पण बाजूला सारून मोलमजुरी करण्यात व्यस्त असायची.तिला कोणी आराम कर म्हटले तर ती एकच उत्तर द्यायची माझ्या लहान मुलाबाळाचं कसे होईल या चिंतेत ती नेहमी राहायची.अश्यातच दीर्घ आजाराने गीताचा पण अचानक मृत्यू झाला आणि भारत व बादल दोन्ही मुले लहान वयातच अनाथ झाली.भारत संतोष चव्हाण व बादल संतोष चव्हाण या दोन्ही मुलांचे लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरवल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दोन लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी मदतीचा हात पुढे येईल का या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे
