Home यवतमाळ दूध उत्पादक गवळी समाज संघटनेचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन

दूध उत्पादक गवळी समाज संघटनेचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन

11

दूध उत्पादक गवळी समाज संघटनेचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन

दूध भाव वाढ करून पशु खाद्य उपलब्ध करून देण्याच्या मागणी करीता गवळी समाज सघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील पशु पालक मोठ्या अडचणी आल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आहे पशु पालक सतत सकटाचा सामना करीत असून दुधाला जो भाव मिळतो त्या भावा पेक्षा चार पट पशु खाद्याचे भाव वाढले आहे सर्की,ढेप,सुग्रास घेणे म्हणजे चटणी मिठाला हि पैसे उरत नाही,जंगलात चारा राहिला नाही,विकत घ्यायचा म्हंटल तर पैसा नाही चाऱ्याचे भाव गगणाल भिडले गायी म्हशी विकाव तर त्या सरळ कत्तल खाण्यात जाते,दूध हे मुलांसाठी व वृद्धा करीता संजीवनी च काम करते परंतु शासन पशु पालांकान कडे दुर्लक्ष करीत आहे शासनानी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरील दोन दोन चारा डेपो उपलब्ध करावे तर पशु खाद्य हे सबसिडी मध्ये उपलब्ध करून द्यावे अन्यथा अमृततुल्य दुधा ऐवजी पावडारच्या दुधा शिवाय उपाय राहणार नाही दूध हे नाशिवंत असल्याने डेरी धारक,दूध संकलन केंद्रावर दूध द्यावेच लागते अन्यथा ते दूध खराब होते याचाच फायदा दूध संकलन केंद्रावर घेत असून उत्पादकांचे एक प्रकारे सोषन होत आहे या प्रकरणी निवासी जिल्हा अधिकारी यांनी दखल घेत या वर उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले याचाच संघटनेने निर्णय घेत १ मार्च पासुन खाजगी दूध वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी प्रकाश लंगोटे, ओंकार चेके,गजानन डोळे,जयंत घोडे,विनोद चेके,प्रभाकर डोळे,सतीश झामरे,दिनेश चावरे,अशोक घाटोळ प्रकाश अवाथळे,संजय डोळे,दिनेश जाधव,दिनेश पाटील, हारीपाल झामरे ,मनोहर डोळे,सुरेश घाटोळ व अनेक दूध उत्पादक गवळी समाज बांधव उपस्थित होते, याची समस्त दूध उत्पादकांनी विक्रेते यांनी नोद घ्यावी असे आवहन ओंकार चेके यांनी केले आहे.

Copyright ©