आत्मनिर्भर महिला संरक्षण समिती तर्फे मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिर
————————————————-
घाटंजी :- असंघटित कष्टकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणार्या विविध योजनांचा लाभ कष्टकऱ्यांना मिळावा यासाठी आत्मनिर्भर महिला संरक्षण समितीच्या अध्यक्ष सौ.ललिता ठाकूर यांनी राबविलेल्या मोफत असंघटित कामगार नोंदणी शिबिराचा लाभ तालुक्यातील जनता घेत आहे आणि खर्या अर्थाने ह्या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना “आशीर्वाद” देत आहे” असे उद्गार माजी न.प. सदस्या सौ जयश्री सचिन धांदे यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलले होते. लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन इत्यादी काम करणारे श्रमजीवी, ज्यांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी. विमा योजनांचा लाभ मिळावा याकरता आत्मनिर्भर महिला संरक्षण समिती यांच्यातर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुंंदन ठाकूर, मनोज हामंद, बालू खांडरे, अंकुश ठाकरे,सचिन धांदे, निखिल डॊहळे, राजेश राठोड,वैष्णवी बोन्द्रे, अंकिता वानखेडे, प्रिया ठाकूर,
यांनी अविरत मेहनत घेतली. असे आयोजकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
