कोरोणाबाधिताच्या संख्येत वाढ तर 2 मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासात 217 जण कोरोना पॉझिटिव्ह 245 कोरोनामुक्त ; 2 मृत्यू
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1725 बेड उपलब्ध
ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1433
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 217 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 245 जण कोरोनामुक्त झाले असून दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1394 व बाहेर जिल्ह्यात 39 अशी एकूण 1433 झाली आहे. त्यातील 43 रूग्ण रूग्णालयात तर 1390 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1208 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 217 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 991 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78546 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 75316 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1797 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्या रूग्णांत नांझा ता. कळंब येथील 65 वर्षीय पुरूष व नांदेड जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 217 रूग्णांमध्ये 91 महिला व 126 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील 45, बाभुळगाव 16, दारव्हा सहा, दिग्रस दोन, घाटंजी 11, कळंब दोन, महागाव एउ, मारेगाव एक, नेर 13, पांढरकवडा 21, पुसद 14, राळेगाव सात, उमरखेड एक, वणी 16, यवतमाळ 51, झरी जामणी चार व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 25 हजार 291 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 46 हजार 649 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.52 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 17.96 आहे तर मृत्यूदर 2.29 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1725 बेड उपलब्ध :
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1725 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 746 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.



