सावळा ते करमाळा दरम्यानच्या पांदण रस्त्याच्या निर्णयात शेतकऱ्यांची निराशा..
———————————————
यवतमाळ- सावळा ते करमाळा दरम्यान शेतकरी हक्काचा मार्गक्रमण करण्याकरिताचा रस्ता शेत सर्वे नंबर १/१ चे शेतकरी रमेश महादेवराव ठाकरे व शेत सर्वे नंबर१/२ चे शेतकरी सुभाष महादेवराव ठाकरे यांनी शासकिय नकाशा प्रमाणे असणाऱ्या पांदण रस्त्याला छेद देत चक्क या नकाशाला बाजूला ठेऊन आपल्या मर्जी प्रमाणे नदीच्या काठाने हा पांदण रस्ता वळविला यात या रस्त्याने मार्गक्रमण करणारे शेतकरी त्रस्त होवून रितसर आपल्या हक्काचा रस्ता मिळवण्यासाठी दारव्हा तहसिलदार यांच्या दालनात सदर प्रकरण पोहचवून न्यायाची अपेक्षा केली. मात्र तहसिलदार महोदयांनी गैरअर्जदार यांच्या बाजूने निर्णय दिल्याने तक्रारदार शेतकरी वर्गात निराशा पसरली आहे.
शासकिय नकाशाप्रमाणे पूर्वजापासून ठाकरे यांच्या शेत सर्वे नंबर १/१ व१/२ मधून पांदण रस्ता जातो. मात्र गैर अर्जदार यांनी तो रस्ता स्वमर्जीने वळवून नदीच्या काठाने वळवून दिला यात शेतकऱ्यांना मोठी कसरत करून मार्गक्रमण करावे लागते. नदी काठाणे रस्ता वळविल्याने शेतकऱ्यांसह जनावरांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय नकाशा प्रमाणे असलेला रस्ता हा सोयस्कर आहे. मात्र नदिकाठून काढून दिलेला रस्ता कित्येक अंतर काटत जावे लागते. यात शेतकऱ्यांचे शेतीचे काम होत नसल्याने अनेक शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे आपणास न्याय मिळेल या आशेने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे व वेगवेळ्या गावातील एकूण ४४ शेतकरी यांनी दारव्हा तहसिलदार यांचे कडे रितसर तक्रार देवून सरळ नकाशा प्रमाणे रस्त्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी चौकशी लावून मंडळ अधिकारी व तलाठी यांचे कडून मोका पाहणी केली. यात नकाशा नुसार रस्ता नसून रस्ता नदी काठाने वळविण्याचे निदर्शनास आले. तसे अहवालही सादर केले. मात्र तहसिलदार दारव्हा यांनी तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय न देता गैरअर्जदार यांच्या बाजूने निर्णय देत अर्जदार यांचे अर्ज नामंजूर केल्याने शेतकरी बांधवांनची मोठी निराशा झाली आहे. याबाबिकडे जिल्हाधिकारी साहेब लक्ष देवून या शेतकऱ्यांना हक्काचा पांदण रस्ता देन्यात या अशी मागणी किसन उईके,रामा उईके,साहेबराव हांडे, पुरुषत्तम चींतावार,संगीता ठाकरे, शाम धुत,प्रसराम राठोड,कमलाबाई कपिले,सुनिता ठाकरे अशा एकूण ४४ शेतकरी बांधव करीत आहे.लवकर न्याय नं मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे
किसन उईके,रामा उईके,साहेबराव हांडे, पुरुषत्तम चींतावार,संगीता ठाकरे, शाम धुत,प्रसराम राठोड,कमलाबाई कपिले,सुनिता ठाकरे अनेक शेतकर्यांनी सह्याचे निवेदन दिले.
