भांबराजा येथिल सुनिल डीवरे हत्याकांडातील पाचवा आरोपी ताब्यात.
———————————————
आरोपी संख्या झाली पाच
———————————————
यवतमाळ- शिवसैनिक व बाजार समिती संचालक असलेल्या सुनिल डीवरे यांच्या हत्येनंतर प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू करीत मारेकऱ्यांना अटक केली. यातील आणखी काही आरोपी फरार होते यापैकी आज दिनांक ६ फेब्रुवारीच्या दोन वाजता पाचवा आरोपी सुरज श्रावण मनवर याला यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी संजय राठोड, नितिन जाधव यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
दिनांक ३ फेब्रुवारी रोजी शिवसैनिक व बाजार समितीचे संचालक माजी सरपंच सुनिल डीवरे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्त्या करण्यात आली. यात एकूण सात आरोपी असल्याचे पुढे आले असताना यातील चार आरोपींना अटक करण्यात आली होती त्यापैकी तिन आरोपी फरार होते. त्यांना तातडीने अटक करण्यासाठी व या हत्येचे कटकारस्थान कुठे उगम पावले याची सखोल चौकशी करण्यासाठी माजी मंत्री आमदार संजय राठोड व शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन देऊन मागणी केली. त्याच सोबत अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी शनिवारी भांबराजा येथे भेट देऊन डीवरे कुटुंबीयांशी चर्चा करून सांत्वना केली. त्यानंतर यवतमाळात गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात उपमहानिरीक्षकानी आरोपी पवन सोननकर, वैभव सोननकर, रोहित भोपडे, सुरेश पाथरीकर यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात विचारपूस केली. आरोपी पवन व वैभव या दोन भावांनी गुन्ह्याची कबुली देत जुन्या वादातून सुनिल डीवरे यांची हत्या केल्याचे सांगितले. त्यांच्यावर गोळीबार केला, नंतर कुऱ्हाडीने डोक्यात घाव घातल्याचे आरोपींनी सांगितले. यानंतर तपासाच्या अनुषघाने आवश्यक त्या सूचना पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिल्या त्यावरून तपास सुरू असून यातील आरोपींपैकी आज रविवारला दुपारी दोन वाजता एक आरोपी सुरज श्रावण मनवर याला त्याब्यात घेवून अटक केली. आता या आरोपी कडून काय माहिती पुढे येणार व आणखी यातील उर्वरित आरोपी कधी अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.



