Home यवतमाळ गवळी समाजातील राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे मिलिंद चवंडके पहिले मानकरी

गवळी समाजातील राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे मिलिंद चवंडके पहिले मानकरी

9

गवळी समाजातील
राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे मिलिंद चवंडके पहिले मानकरी

 

अध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेल्या मिलिंद चवंडके यांना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचा बहुमान

सिंधुदुर्ग – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेल्या पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेने उत्तर महाराष्ट्र विभागामधून सन २०२० चा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार अध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेले पत्रकार व इतिहास संशोधक मिलिंद सदाशिव चवंडके यांना सपत्निक समारंभपूर्वक प्रदान केला. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानपत्र, अडीच हजार रूपये रोख, शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ असे होते.

राज्यस्तरीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी भूषविले. ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते मोठ्या थाटात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रविंद्र बेडकिहाळ यांनी अध्यात्मिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल मिलिंद चवंडके यांची विशेष ओळख करून दिली. वसंत भोसले यांनी अध्यात्मिक पत्रकारिता व इतिहास संशोधन या मिलिंद चवंडके यांच्या वेगळेपणाच्या कार्याची प्रशंसा केली.
तर सर्वात जास्त मागलेलेला समाज हा गवळी समाज आहे आणि या समाजातील पत्रकार हा दर्पण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले हि बाब समाजासाठी अभिमानास्पद आहे

राज्यभरातून आलेल्या दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकारांच्यावतीने बोलताना मिलिंद चवंडके म्हणाले, पत्रकारितेचे व्रत घेऊन अडीच तप पूर्ण झाल्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने दर्पण पुरस्कार देऊन केलेला सन्मान माझ्या पत्रकारितेच्या कार्याची पावती देणाराच ठरला आहे. पंढरीची पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांपैकी फक्त एकाच वारकऱ्यास पांडुरंगाच्या शासकीय महापूजेत मान मिळतो तसा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने उत्तर महाराष्ट्र विभागामधून सन २०२० च्या दर्पण पुरस्कारासाठी माझी निवड करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीत पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा आणि त्यांच्या एकमेव स्मृतीस्थळी नतमस्तक होण्याचा मान देत माझा सपत्निक केलेला सन्मान जीवनाला स्फूर्ती देणारा आहे. यामुळे मी भारावून गेलो.

पंढरीचा पांडुरंग जसा भक्ती पाहून पायी वारीचे फळ म्हणून महापूजा सोहळ्याचा मान देतो तसे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने माझे अडीच तपाचे पत्रकारितेचे व्रत पाहून हा राज्यस्तरीय बहुमान असलेला दर्पण पुरस्कार पत्रकारांची पंढरी असलेल्या पोंभुर्ले या पावनस्थळी मला सपत्निक प्रदान केला, त्याबद्दल मी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे विचार आणि कार्य दर्पण पुरस्कारप्राप्त आम्ही राज्यभरातील सर्वजण आमच्या गावी घेऊन जात आहोत, असे मिलिंद चवंडके यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या पत्रकार बांधवांनी मिलिंद चवंडके यांना व्यक्तिशः भेटून अध्यात्मिक पत्रकारिता व इतिहास संशोधन हे वेगळेच क्षेत्र पत्रकारितेसाठी निवडल्याचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमास आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वंशज सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, विश्वस्त सौ.अलका बेडकीहाळ (फलटण), अमर शेंडे, माध्यम तज्ज्ञ योगेश त्रिवेदी (मुंबई), शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे (मुंबई), शांताराम गुरव, रोहित वाकडे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, डाॅ. रमेश गोटखडे (अमरावती) यांच्यासह दर्पण पुरस्कारप्राप्त महाराष्ट्राच्या विविध विभागामधील सन्मानार्थी उपस्थित होते. सन २०१९ च्या दर्पण पुरस्काराचेही वितरण याच कार्यक्रमात करण्यात आले. निसर्गाच्या कुशीत वसलेले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थळ पुरस्कार सोहळ्यानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांना पहाता आले याचे समाधान व्यक्त करताना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीस धन्यवाद दिले

Copyright ©