Home Breaking News घाटंजी लखमाई इण्डेन गॅस एजन्सी कडून इंडियन ऑयल ग्राहक दिवस साजरा.

घाटंजी लखमाई इण्डेन गॅस एजन्सी कडून इंडियन ऑयल ग्राहक दिवस साजरा.

13

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

घाटंजी लखमाई इण्डेन गॅस एजन्सी कडून इंडियन ऑयल ग्राहक दिवस साजरा.
——————————————–
विजेत्या ग्राहकांना बक्षीस जाहीर करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत!
——————————————–
घाटंजी-दीनांक ९ जानेवारी2022 ला लखमाई इण्डेन घाटंजी येथे इंडीयन ऑयल ग्राहक दीवस साजरा करण्यात आला त्यावेळी प्रत्येक डिलिव्हरी बाॅयनी ग्राहकांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. तसेच नियमित ऑनलाइन रिफील पेमेंट करणारे व नियमित व्यावसायिक सिलेंडर उचल करणारे ग्राहकांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले त्यांना ॲपराॅन आणि ट्राॅली भेट दीली.त्याचप्रमाणे महीला ग्राहकांसाठी ऑनलाइन डिश डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात एकुण 25 महीलांनी सहभाग घेतला त्यात सौ. नम्रता विजय बुक्कावार प्रथम क्रमांक (एक सिलेंडर रिफील फ्री.), सौ. प्रिती अंजिकर द्वितीय क्रमांक (एका सिलेंडर रिफील वर 700 रु. सुट) आणि सौ. शिल्पा अमोल ढगले तृतीय क्रमांक ( एका सिलेंडर रिफील वर 500 रु. सुट) यांनी बक्षिस प्राप्त केले तसेच सहभागी सर्व महीलांना प्रोत्साहन पर बक्षिस म्हणुन सिलेंडर ट्राॅली व ॲपराॅन देण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणुन सौ. कल्पना सचीन माहूरे (प्रो. प्रा. लखमाई इण्डेन) यांनी विजेत्यांची निवड केली. वरील कार्यक्रम श्री निलेश व्ही ठाकरे यवतमाळ सेल्स एरीया मॅनेजर इंडियन ऑयल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री गजानन राऊत (व्यवस्थापक लखमाई इण्डेन घाटंजी) , गोपाल वाघाडे,अमीत दिडशे ,संजय वहीले, सुमीत डंभारे, अमोल गंथडे, संतोष मोहीजे आणि सर्व डिलिव्हरी बाॅयनी परीश्रम घेतले.

Copyright ©