Home यवतमाळ सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

33

 लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान 9422192691

सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

लाडखेड पं.स.दारव्हा अंतर्गत जि.प.प्रा.म.कें.शाळा,लाडखेड येथे भारताची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९१ जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किशोर उईके होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल तायडे, जेष्ठ शिक्षिका सिंधुताई दुधे होत्या.
सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.
यासाठी शाळेतील मुली सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सावित्रीच्या लेकी झाल्या.
वेशभूषा स्पर्धेत त्या सहभागी झाल्या. त्याच प्रमाणे रांगोळी स्पर्धा सुद्धा घेण्यात आली.
मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
यावेळी वेषभुषा व रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता नासरे तर आभार प्रदर्शन अनुराधा कराळे यांनी केले.
यावेळी शाळेतील शिक्षिका प्रणिता मोरे, शिल्पा काळे, प्राजक्ता दुधे तथा विद्यार्थी उपस्थित होते.

Copyright ©