किन्ही प्रतिनिधी सचिन मोरकर
किन्ही गावात रस्त्याच बनला सांडपाण्याचे गटार
ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात
यवतमाळ ते आर्णी रोडवर ७ किलोमीटर अंतरावर किन्ही गाव आहे. या गावात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते परंतु बरेच दिवस झाले आता काम बंद आहे आर्णी वरून किन्ही गावात येण्या साठी येत असलेल्या डांबरी रस्त्यावर गावातील सांडपाण्याचे डबके साचून आहे. महत्त्वाचे म्हणजे ते सांडपाणी बोगद्यातून झोपडपट्टी मध्ये आकाश डुकरे च्या घराकडे जाण्याच्या रस्त्यावर सुध्दा आहे या मुळे या रास्त्या वर ये जा करण्यासाठी पाण्यातून जाण्यास भाग पडते या कडे राष्ट्रीय महामार्ग रोड बांधकाम व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झालेले दिसते या संदर्भात ग्रामपंचायत किन्ही यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही या संदर्भात विनंती अर्ज सादर केला आहे त्याच्या पेक्षा जास्त त्या वर आम्ही काही ही करू शकत नाही हे काम केंद्र शासनाच्या अधीन आहे. ही नाली केव्हा होणार , सर्व सादर नागरिकणा यासाठी शासनाकडे आतुरतेने वाट पाहत आहे शासन २ वर्ष होऊन गेले तरी कामाला केव्हा वेग आणणार आणि या नालीचे काम केव्हा पूर्ण करणार या कडे २ वर्षा पासून किन्ही गावातील सर्व नागरिक तसेच प्रामुख्याने झोपडपट्टीत राहणारे सर्व नागरिक लक्ष देऊन वाट पाहत आहे.
