नव्यानेच सुरू झालेल्या मॉल मध्ये ९ रूपये किलो साखर
नव्यानेच सुरू झालेल्या मॉल मध्ये ९ रूपये किलो साखर
विक्रीचा फलक सध्या चर्चेचा विषय बनला आहे अनेक ग्राहक ९ रुपये किलो साखरे चे फलक पाहून आकर्षित होत आहे अनेकांची मनशा झाली की मॉल मध्ये अत्यल्प दरात सर्वच साहित्य मिळते याच मंशेने येथे गर्दी होत आहे विशेष म्हणजे अनावश्यक वस्तूंना कमी रेट लावण्यात येतो तर काही वस्तूंवर वाजवी पेक्षा जास्त भाव लावण्यात येत आहे आणि बारा ते पंधराशे रुपयाची खरेदी कराल तेव्हा केवळ एक किलो साखर देण्यात येत आहे यात ग्राहांकाची मोठ्या प्रमाणात दिशाभुल करण्यात येत आहे या कडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे विशेष म्हणजे
ओमिक्राॅनचे सावट असताना स्मार्ट सुपर स्टोअरकडुन
शासन आदेशाला केराची दाखवली जात आहे टोपली
यवतमाळ शहरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअरच्या शुभारंभाचा मोठा गाजावाजा सुरू असून यवतमाळ शहरामध्ये अनधिकृतपणे बाजारात पाच ते सहा वाहनावर लाऊड स्पीकर तसेच डीजे लावून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.सर्वत्र ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव दिसत असून प्रशासनाच्यावतीने एकीकडे निर्बंध लावण्यात आले आहे तर दुसरीकडे स्मार्ट सुपर स्टोअरच्या शुभारंभासाठी यवतमाळ शहरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.दि.३० डिसेंबर रोजी दिवसभर यवतमाळ शहरामध्ये ठिकाणी फिरून मोठ्या आवाजामध्ये लाऊड स्पीकर व डीजेच्या गाण्यांवर या सुपर स्टोअरची जाहिरात करण्यात येत होती.यामुळे नागरिकांना या ध्वनी प्रदूषणाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.यासंदर्भात यवतमाळ तहसीलदार तसेच यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला रितसर लेखी तक्रार देण्यात आली असून या ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या स्मार्ट सुपर स्टोअर च्या बाजूला दोन भव्य हॉस्पिटल असून यामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.तसेच स्मार्ट सुपर स्टोअर च्या उद्घाटनाचे यवतमाळ शहरामध्ये ठिकाणी रस्त्याच्या कडेला विद्युत खांबावर जाहिरात लावून शहरात विद्रुपीकरणाचे काम या स्मार्ट सुपर स्टोअरच्या माध्यमातून सुरू आहे.विशेष म्हणजे याची नगरपालिकेकडून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे कळते.
यवतमाळ शहरामध्ये सध्या नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत अच यवतमाळ शहरामध्ये असलेल्या अनाधिकृत फ्लेक्स काढण्यात येत असून अशाप्रकारे विद्युत पोल वर लावण्यात येणारे फ्लेक्स नगरपालिकेच्या वतीने तात्काळ काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली.
सर्वत्र ओमिक्रॉनचे सावट असल्याने कार्यक्रमांना बंदी घातली गेली आहे.तसेच डीजेला परवानगी देण्यात येत नसून ध्वनी प्रदूषण संदर्भात तहसील कार्यालयाला तक्रार प्राप्त झाली असून याची चौकशी करून संबंधितावर योग्य काहीही कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार कुणाल झाल्टे सांगितले.
