Home यवतमाळ आंतरविद्यापीठ स्पर्धेत बाबाजी दाते हाँकी अँकडमि च्या खेळाडूची निवड ..

आंतरविद्यापीठ स्पर्धेत बाबाजी दाते हाँकी अँकडमि च्या खेळाडूची निवड ..

29

आंतरविद्यापीठ स्पर्धेत बाबाजी दाते हाँकी अँकडमि च्या खेळाडूची निवड ..

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने २०२१ – २२ सत्रातील अमरावती विद्यापीठ निवड चाचणीचे आयोजन दिनांक ६ ते ७ डिसेंबर २०२२ रोजी अमरावती येथे करण्यात आले होते, त्यामध्ये यवतमाळ मधील बाबाजी दाते अकॅडमी येथील शिव युवराज बाेरकर या खेळाडूची निवड ग्वाल्हेर येथे होणाऱ्या १६ ते २० जानेवारी २०२२ रोजी जिवाजी युनिवर्सिटी येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.तसेच बेरार हाँकी अँकडमि अमरावती तर्फे हाँकी इन्डीयाचे पहीले जूनियर राष्ट्रीय स्पर्धेत यवतमाळ जिल्हाचे नेतृत्व केले होते.या संघात यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते हाँकी अँकडमी खेळाडूचा दर्जेदार खेळाडू आहे. विद्यापीठाच्या वतीने अमरावती येथे झालेल्या निवड चाचणी मध्ये बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील शिव युवराज बाेरकर या हॉकी खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड करण्यात आली हा खेळाडू १६ ते २२ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत आपल्या खेळाचे चुणूक दाखवून अमरावती विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत. खेळाडूंना विशूद्ध विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते तसेच सतीश फाटक अध्यक्ष हाँकी असोसिएशन यवतमाळ , बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य. साै. वर्षा कुळकर्णी प्रा. रवीजीत गावंडे, अभिजीत पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

शिव आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षिका साै. मनिषा आखरे हाँकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रीक्ट यवतमाळ चे सचिव,
तसेच आई-वडील यांना देतात.

या खेळाडूंना उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचनालय अमरावती विभाग अमरावती विजय संतान सर, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी .चंद्रकांत उप्पलवार, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिरसागर, प्रा.डॉ प्राध्यापक मार्कस लाकडे सहसचिव हाँकी असाेसिएशन आँफ डिस्ट्रीक्ट यवतमाळ, बबलू यादव, विनाेद नायडू,वरिष्ठ खेळाडू जितू पाखरे धनराज झोंबाडे,पाली व सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले.

Copyright ©