वणी तालुका प्रतिनिधी :- निलेश चौधरी
यवतमाळ जिल्ह्यातील युवासेनेचे ( युवती ) ‘पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
जिल्हा युवती अधिकारी म्हणून वणी येथील मीनल गौरकार यांची वणी-आर्णी विधानसभा क्षेत्रासाठी निवड करण्यात आली आहे. अभिषा गौरकार यांची युवती तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मा. पालकमंत्री आमदार संजय राठोड व मा. आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.
