वणी तालुका प्रतिनिधी :- निलेश अ. चौधरी
मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतिने राज्यस्तरीय कुंग- फु कराटे स्पर्धेचे आयोजन
एकविसाव्या शतकात संपुर्ण युवा पिडी ही मोबाईल मधील काल्पनिक खेळामध्ये मोठ्या प्रमाणात रमलेली आहे. त्यामुळे नवोदित बालक हे मैदानी खेळापासून खुप दुर आहे. हीच बाब लक्षात ठेवत मार्शल आर्ट ॲन्ड स्कुल गेम असोसिएशनच्या वतिने प्रथम राज्यस्तरीय ओपन कुंग-फु कराटे स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा स्व.भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह ,नगर भवन आंबेडकर चौक वणी ईथे आयोजित करण्यात आली असुन कार्यक्रमाचे बक्षिस वितरण वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न होत असुन , प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजयबाबु चोरडीया ,राजाभाऊ बिलोरिया ,व्यापारी आघाडी संघटनेचे शहर उपाध्यक्ष रवी रेभे , पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के,संगिताताई खटोड यांच्या उपस्थित पार पडणार आहे.
या राज्यस्तरीय ओपन कुंग-फु
कराटे स्पर्धेचा आस्वाद जनतेनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
