डॉ प्रदिप बोरगांवकर यांचा आगळा वेगळा उपक्रम
प्रतिनिधी दारव्हा दत्ताजी खोपे
( मुलीच्या लग्नाचे औचित्य साधून ( गणेश पूर येथील पारधी तांड्यात दिल्या भेटवस्तू )
येथील प्रसिद्ध डॉ प्रदिप बोरगांवकर यांच्या मुलीचे आसावरीचे लग्न दि २९ नोव्हे ला यवतमाळ येथे झाले . लग्न आटोपल्या नंतर दारव्हा तालुक्यातील गणेशपूर जवळील पारधी तांडा येथील वस्ती मध्ये जाऊन नव जोडप्याच्या हातून वस्तीतील नागरिकांना ताट वाटी,ग्लास अहेराच्या स्वरूपात दिले . डॉ प्रदीप बोरगांवकर यांना तिन मुली असून प्रत्येक मुलीच्या विविहाचे औचित्य साधून या पद्धतिचा उपक्रम त्यांनी राबविला . त्यांची पत्नी प्रज्ञा यांचे निधन होऊन 20 वर्ष झाले . मुली लहान होत्या लहान पणापासून मुलींचा सांभाळ डॉक्टरांना करावा लागला . तीनही मुलींना उच्च शिक्षित करून मोठे केल .योग्य ठीकाणी त्यांचा विवाह करून दिला .
एवढेच नव्हेतर १५ ऑगस्ट २६ जानेवारी ला गणतंत्र व प्रजासत्ता च्या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्याना पुस्तक पेनाचे वाटप करतात . त्यांनी घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे .
