Home यवतमाळ केळापुर तांडा येथील जि. प. शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत

केळापुर तांडा येथील जि. प. शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत

27

केळापुर तांडा येथील जि. प. शाळेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत
——————————————–
अध्यक्ष पदी, अरविंद चव्हाण तर उपाध्यक्ष पदी नरेश चव्हाण यांची निवड
——————————————–
घाटंजी-(तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील केळापूर तांडा जिल्हा परिषद शाळेतील मागील शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यकाळ संपुष्टात आल्याने नुकतीच नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून अरविंद चव्हाण तर उपाध्यक्ष म्हणून नरेश चव्हाण यांची उपस्थित पालक वर्गातून बिनविरोध निवड करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक अविनाश राठोड यांनी आयोजित शाळा व्यवस्थापन समितीचे गठण करण्याकरिता सर्वत्र पालक वर्गांना प्राचारान करून सभेचे आयोजन करण्यात आले. यात उपस्थितांतून अध्यक्ष म्हणून अरविंद चव्हाण यांचे नाव पुढे आले तर उपाध्यक्ष म्हणून नरेश चव्हाण यांचे नाव सुचविण्यात आले. ते बिनविरोध निवड करण्यात आले. त्याच सोबत सदस्य म्हणून भारत राठोड, वसंता राठोड, देविका संतोष राठोड, वैजयंती उमेश जाधव, अश्विनी रवींद्र राठोड यांना निवडण्यात आले तर शिक्षणतज्ञ म्हणून नितेश चव्हाण तर ग्राम पंचायत प्रतिनिधी म्हणून सुनीता गणेश चव्हाण व सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अविनाश राठोड अशी समिती गठित करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची अविरोध निवड झाल्याने गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Copyright ©