Home यवतमाळ भाई अमन फ्रेंड्स ग्रुप तर्फे फुटपाथवर राहणाऱ्या,मनोरुग्ण व गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप

भाई अमन फ्रेंड्स ग्रुप तर्फे फुटपाथवर राहणाऱ्या,मनोरुग्ण व गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप

31

भाई अमन फ्रेंड्स ग्रुप तर्फे फुटपाथवर राहणाऱ्या,मनोरुग्ण व गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप

सध्या हिवाळा सुरू असून थंडीने जोर धरला असल्याने यवतमाळ शहरात ठिकठिकाणी फुटपाथवर तसेच उघड्यावर राहणाऱ्या गरजवंतांना भाई अमन फ्रेंड्स ग्रुप तर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भाई अमन फ्रेंड्सचे सर्वेसर्वा भाई अमन यांच्यासह फ्रेंड्स ग्रुपचे अनेक सदस्य हजर होते.
त्यांनी यवतमाळ शहरात,आर्णी रोड,शहर पोलीस स्टेशन समोर, शनिमंदिर चौक,तिवारी चौक,दत्त चौक,आठवडी बाजार,शासकिय रुग्णालयात,हनुमान आखाडा चौक यासह शहरातील भागात जाऊन मनोरुग्णांना,शासकिय रुग्णालयातील गरजवंत नातेवाईकांना ब्लँकेटचे वाटप केले.यवतमाळ जिल्ह्यातील परोपकारी व्यक्तिमत्त्व आणि शहराचे अग्रगण्य समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे भाई अमन नरसिंगानी यांनी संकटकाळात गरिबांना मदत करण्यास कधीही मागे हटले नाही.
कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून गरीब कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला,या संकटाच्या काळात, एक संकटमोचक म्हणून,भाई अमन गरीब कुटुंबांना,गरजूंना मदत करण्याचे काम करत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व, भाई अमन आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सामान्य नागरिकांना व गरजवंताना अन्न वाटप करून, मास्क, सॅनिटायझर्स, औषधे, फळे, ड्राय फ्रूट्स इत्यादींचे वितरण करून मदतीचा हात पुढे केला आणि आजही ते सेवा देत आहेत.ठिक ठिकाणी ब्लँकेट वाटप करतांना अनेक गरजवंताचे अश्रु अनावर झाले व भाई अमन यांचे आभार व्यक्त केले.यावेळी भाई अमन सह रहीम भाई,हबीब कुरेशी,जावेद भाई,जाफर चाचा,अनिस लाला,बाबा भाई,निजार भाई,रफिक शेख,दिनेश पाटील,मोनु डॉन,
साद नरसिंघानी,शेख समीर,मोईन खान,नाजीम शेख,अजय ठाकूर,शाहरुख पठाण,अखिल खान,सिद्धार्थ,मकसूद अली,नंदादीप फाउंडेशनचे संदिप शिंदे आदी उपस्थित होते

Copyright ©