कार्यकारी संपादक राजू चव्हाण
पारवा येथे जातीय सलोखा व शांतता समितीची सभा
———————————————
घाटंजी- ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असल्याने जातीय सलोखा व शांतता समितीची सभा पारवा पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आली.
पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सर्वत्र गावातील पोलिस पाटील व ग्राम तंटा मुक्ती अध्यक्ष यांना प्राचारन करून पोलीस स्टेशन मध्ये जातीय सलोखा व शांतता समितीची सभा पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी घेतली यावेळी प्रत्येक गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी ठाणेदार चव्हाण यांनी पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या कडून गावातील परिस्थिती जाणून घेतली. सोबतच आगामी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साजरे करतांना शासनाने दिलेले मार्गदर्शन सूचनेप्रमाणे साजरे करावे असे आवाहन सुध्दा यावेळी करण्यात आले. गणपती उत्सव व नवरात्र उत्सवासह मागील तीन महिन्यांपासून गावात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्याकरिता ज्या पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्षाने मदत केली अश्या पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्षाचे यावेळी ठाणेदार विनोद चव्हाण यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय पुढील काळात शेतकरी आत्महत्या रोखणे व गावागावांतील युवक युवतींना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असून या सकारात्मक बाबीला आपण गावातील सुज्ञ नागरिक या नात्याने सहकार्य करावे असे फर्मान ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले. या सभेत कायदा व सुव्यवस्था याविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या सभेला पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
