Home यवतमाळ आयटीआय मध्ये रोजगार भरती मेळावा 26 नोव्हेंबरला ऑनलाईन होणार

आयटीआय मध्ये रोजगार भरती मेळावा 26 नोव्हेंबरला ऑनलाईन होणार

31

आयटीआय मध्ये रोजगार भरती मेळावा 26 नोव्हेंबरला ऑनलाईन होणार

कृषी ऊत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रिया रद्द

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज आणि उद्या जिल्ह्यात

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त

 

यवतमाळ दि. 23 यवतमाळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) मध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा ऑफलाईन शिकाऊ उमेदवारी तथा रोजगार भरती मेळावा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झाला असून सदर भरती मेळावा हा ऑनलाइन पद्धतीने दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येईल.

याबाबतची ऑनलाइन लिंक दि.24 नोव्हेंबर रोजी विविध ग्रुप वर पाठविण्यात येईल. तरी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन भरती मेळाव्याच्या ऑनलाईन लिंक करिता संबधित निदेशकांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व आयटीआय प्राचार्य, गट निदेशक, निदेशक यांनी देखील या बदलाची नोंद घेवून उमेदवारांना सहकार्य करावे, असे यवतमाळ बी.टी.आर.आय.चे अंशकालीन प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी कळविले आहे.

__________________________

 

कृषी ऊत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रिया रद्द

 

यवतमाळ दि. 23 (जिमाका) : यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव, राळेगांव, नेर, वणी, कळंब, पुसद, दारव्हा या कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकी करिता प्रारुप याद्या 10 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करुन 22 नोव्हेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत मतदार यादीवर आक्षेप व हरकती मागाविण्यात आल्या होत्या. तथापि, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण यांचे 22 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये कृषी ऊत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रीया पुढील आदेशापावेतो रद्द करण्यात आलेली आहे.

प्रारुप याद्यावर मागविण्यात आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने 23 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत उपनिबंधक कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आल्या होत्या. कृषी ऊत्पन्न बाजार समित्यांचा निवडणुक कार्यक्रम पुढील आदेशापावेतो रद्द करण्यात आलेला असल्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दिनांक 23 ते 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावण्या स्थगीत करण्यात आल्या आहेत. याबाबत उपरोक्त् सर्व बाजार समित्यांनी नोंद घ्यावी व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2163 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 23 नोव्हेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात तीन व बाहेरजिल्ह्यात एक अशी एकूण चार आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 318 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 317 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72925 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71134 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 63 हजार 484 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 90 हजार 523 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.55 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.31 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2163 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2163 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज आणि उद्या जिल्ह्यात

यवतमाळ दि.23 (जिमाका) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

24 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून दुपारी 4 : 40 वाजता दीनदयाल प्रबोधिनी निळोणा येथे आगमन व आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी 5.20 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह यवतमाळकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता यवतमाळ विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता विश्रामगृह येथून गोधनीरोड वरील प्रयास वनकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता प्रयास वन येथे आगमन व वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 9.20 वाजता मोटारीने मातोश्री सभागृहाकडे प्रयाण. सकाळी 9:25 वाजता मातोश्री सभागृह येथे आगमन व प्रेरणास्थळ येथे आयोजित प्रार्थना आणि वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 10 : 30 वाजता मातोश्री सभागृह येथे जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे आणि आरोग्य शिबिराचे राज्यपाल श्री.कोश्यारी हे उद्घाटन करतील. दुपारी 2 वाजता हेलिपॅडकडे प्रस्थान व दुपारी 2.20 वाजता शासकीय हेलीकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.

Copyright ©