Home Breaking News पालकमंत्री यांनी घेतला विविध यंत्रणेचा आढावा

पालकमंत्री यांनी घेतला विविध यंत्रणेचा आढावा

30

२४ तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात चार आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 246 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 246 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72926 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71135 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील एका पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 63 हजार 717 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 90 हजार 768 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.55 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.41 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2167 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2167 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 780 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

_________________________

पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी

सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही

85 सि.सि.टी.व्ही कॅमेरे लावणार

संरक्षक भिंतीची उंची 10 फुट वाढवणार

15 नवीन हायमास्क लाईट लागणार

रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी

एक पोलीस जीप व दोन मोटारसायकल रूग्णालय परिसराच्या गस्तीसाठी

यवतमाळ दि. 24 नोव्हेंबर : वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काही दिवसांपुर्वी घडलेली घटना दुर्दैवी होती मात्र यापुढे या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी येथे तातडीने सुरक्षीततेच्या उपाययोजना करण्यासाठी सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, हायमास्क लाईट, संरक्षक भिंतीची उंची वाढविणे, कायमस्वरूपी पोलीस चौकी इ. कामांना विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात येत असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयातील संपुर्ण परिसराची पालकमंत्री यांनी आज पाहणी केली व येथील सुरक्षेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र गवार्ले प्रामुख्याने उपस्थित होते.

शासकीय रुग्णालयाचा सुमारे 127 एकर परिसर पुर्णपणे सी.सी.टी.व्ही. अंतर्गत आणण्यात येत असून त्यासाठी सध्या 85 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सी.सी.टी.व्ही. यंत्रणेद्वारे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व वाहनाचे छायाचित्र जतन केले जाणार आहे. तसेच रुग्णालयाच्या संपुर्ण परिसरात उजेड राहावा म्हणून जुन्या तीन हायमास्क लाईटच्या दुरूस्तीसह नवीन 15 हायमास्क लाईट लावण्यात येत आहे. यासोबतच संरक्षक भिंतीची उंची 10 फुटापर्यंत वाढवून त्यावर 2 फुट तारचे कुंपण बांधण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाची संरक्षण भिंत अतिक्रमणापासून मोकळी करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर ठिकाणचे अनावश्यक प्रवेशद्वार पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी बांधण्यात येणार असून येथे एक पोलीस जीप व दोन मोटारसायकल पोलीसांच्या गस्तीसाठी राहतील.

पालकमंत्री यांनी रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेबाबत रुग्णालय प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. केवळ इमारत चकाचक ठेवून चालणार नाही त्यासोबत संपुर्ण परिसर नियमितपणे स्वच्छ राहील याकडेही लक्ष ठेवण्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी झाडांची उंची वाढल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पडत असल्यास त्याठिकाणच्या झाडांच्या फांद्या कापून परिसरात उजेड राहील व परिसर सि.सि.टी.व्ही. च्या दृष्टीक्षेपात राहील याबाबत दक्षता घेण्याचे सांगितले. याठिकाणचे काही बंद असलेले लाईट तातडीने सुरू करण्याचेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी राहता यावे, यासाठी परिसरातील वसतीगृहाची क्षमता वाढ करून 200 मुलांकरिता वाढीव वस्तीगृह बांधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पालकमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांसोबतही चर्चा केली सुरक्षीततेच्या दृष्टीने उपायोजना लवकरच पुर्ण करण्यात येतील असे सांगितले. काही दिवसांपुर्वी या परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना मुख्यमंत्री यांचेकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला रुग्णालय अधिक्षक सुरेंद्र भुयार, शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, विद्युत विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी व संबंधीत अधिकारी
पं.दिनदयाल उपाध्याय यांचे विचार व कार्य प्रेरणादायी

– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

दिनदयाल प्रबोधीनीला भेट

यवतमाळ दि. 24 नोव्हेंबर : पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांचे विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. पं. उपाध्याय यांचे विचार आणि कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

24 नोव्हेंबर रोजी यवतमाळपासून जवळ असलेल्या निळोणा येथील दिनदयाल प्रबोधीनीला भेट दिल्यानंतर भारतरत्न नानाजी देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. कोश्यारी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर दिनदयाल प्रबोधनीच्या उपाध्यक्षा श्रीमती ज्योती चव्हाण व सचिव विजय कद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. कोश्यारी म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय हे शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. एवढे मोठे व्यक्तीमत्व असतांना देखील ते साधेपणाने राहायचे. स्वत:ची कामे स्वत: करायचे. जेवढे ते साधे होते. तेवढीच त्यांची भाषा साधी होती. आपली संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातील फरक ते सहजपणे व सोप्या भाषेत सांगायचे.

समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपुर्ण जीवन समर्पित केले. शेवटच्या माणसाचे कल्याण झाले पाहिजे, हाच त्यांचा ध्यास होता. असे ते म्हणाले.

पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा घेऊन यवतमाळ येथील ही दिनदयाल प्रबोधिनी काम करीत आहे, असे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले, प्रबोधिनीचे कार्य प्रशंसनीय आहे. पारधी समाजाच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी प्रबोधिनी करीत असलेले कार्य गौरवास्पद आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे. असे ही श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले.

प्रास्ताविकातून बोलताना श्री. कद्रे म्हणाले, संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाले आहे. पारधी समाजाच्या विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी संस्था काम करीत आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार यासह विविध प्रकल्प संस्था राबवित असल्याचे सांगितले.

सभागृहात राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे उपाध्यक्षा श्रीमती चव्हाण आणि सचिव श्री. कद्रे यांनी दिनदयाल पुस्तक, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील भगिनींनी राज्यपालांचे भाऊबीजेनिमित्त औक्षवण केले. संस्थेच्या कार्याची माहिती पॉवर पॉइंट सादरीकरणातून गजानन परसोडकर यांनी दिली.

कार्यक्रमाला आमदार सर्वश्री ॲड. निलय नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे,डॉ. अशोक उईके, नामदेव ससाने,संजीवरेड्डी बोदकूरवार तसेच प्रबोधिनीशी संबंधित असलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आभार श्रीमती चव्हाण यांची मानले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे दिनदयाल प्रबोधिनी परिसरात आगमन होताच शबरी अतिथीगृहासमोर पोलिस पथकाने मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी दिनदयाल प्रबोधिनीच्या मुख्य सभागृहातील पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. व परिसरात वृक्षारोपण केले.
पालकमंत्री यांनी घेतला विविध यंत्रणेचा आढावा

सिंचन आवर्तनाचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

यवतमाळ दि. 24 नोव्हेंबर : जिल्ह्यातील पूस, अरुणावती व बेंबळा या तीन मोठ्या प्रकल्पातून दुहंगामी पीक, रब्बी पीक व उन्हाळी पीक यासाठी सिंचन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी सिंचन कार्यालयात पाण्याची मागणी नोंदवून सिंचन आवर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृह येथे पालकमंत्री यांनी आज जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती व सिंचन प्रकल्पावरील कालवे सल्लागार समितीची आढावा बैठक तसेच कोविड परिस्थीती व लसीकरण, यवतमाळ शहर वाढीव पाणी पुरवठा योजना व भूमीगत गटार योजना या विषयांवर संबंधीत यंत्रणांचा आढावा घेतला. बैठकीला आमदार संदिप धुर्वे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता मनिष राजभोज, पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले की ज्या भागात सिंचन कमी आहे तेथे सिंचन वाढावे यासाठी सिंचनाच्या योजना हाती घ्याव्या, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे याकरिता कालवे दुरूस्तीचे कामे प्राधाण्याने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यवतमाळ जिल्ह्यात जमीन चांगली आहे, पाऊस पाणी देखील भरपूर आहे त्यामुळे पीक पद्धत बदलवून आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरेल असे बागायती क्षेत्र वाढविण्यासाठी तसेच रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याबाबतही त्यांनी सांगितले.

अमृत योजने अंतर्गत यवतमाळ शहर पाणी पुरवठाच्या कामात प्रगती नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा विभागाने जबाबदारीपुर्वक कामे करावी, कंत्राटदाराकडून माणसे व सामग्री वाढवून उवरित कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. तर भुयारी गटारची काम वेळेत पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालीकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येवून योग्य नियोजन व समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला.

कोविड लसिकरणाचा आढावा घेतांना घरोघरी लसिकरणाची टिम पाठवून पुढील महिण्याच्या 10 तारखेपर्यंत पहिल्या डोजचे 100 टक्के काम पुर्ण करण्याचे तसेच उपलब्ध यादीनुसार पात्र असलेल्या 2 लाख 50 हजार नागरिकांना लवकरात लवकर दुसऱ्या डोज देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दिनदयाल प्रबोधीनीला भेट

यवतमाळ दि. 24 नोव्हेंबर : पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांचे विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. पं. उपाध्याय यांचे विचार आणि कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

24 नोव्हेंबर रोजी यवतमाळपासून जवळ असलेल्या निळोणा येथील दिनदयाल प्रबोधीनीला भेट दिल्यानंतर भारतरत्न नानाजी देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. कोश्यारी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर दिनदयाल प्रबोधनीच्या उपाध्यक्षा श्रीमती ज्योती चव्हाण व सचिव विजय कद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. कोश्यारी म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय हे शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. एवढे मोठे व्यक्तीमत्व असतांना देखील ते साधेपणाने राहायचे. स्वत:ची कामे स्वत: करायचे. जेवढे ते साधे होते. तेवढीच त्यांची भाषा साधी होती. आपली संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातील फरक ते सहजपणे व सोप्या भाषेत सांगायचे.

समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपुर्ण जीवन समर्पित केले. शेवटच्या माणसाचे कल्याण झाले पाहिजे, हाच त्यांचा ध्यास होता. असे ते म्हणाले.

पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा घेऊन यवतमाळ येथील ही दिनदयाल प्रबोधिनी काम करीत आहे, असे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले, प्रबोधिनीचे कार्य प्रशंसनीय आहे. पारधी समाजाच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी प्रबोधिनी करीत असलेले कार्य गौरवास्पद आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे. असे ही श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले.

प्रास्ताविकातून बोलताना श्री. कद्रे म्हणाले, संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाले आहे. पारधी समाजाच्या विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी संस्था काम करीत आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार यासह विविध प्रकल्प संस्था राबवित असल्याचे सांगितले.

सभागृहात राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे उपाध्यक्षा श्रीमती चव्हाण आणि सचिव श्री. कद्रे यांनी दिनदयाल पुस्तक, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील भगिनींनी राज्यपालांचे भाऊबीजेनिमित्त औक्षवण केले. संस्थेच्या कार्याची माहिती पॉवर पॉइंट सादरीकरणातून गजानन परसोडकर यांनी दिली.

कार्यक्रमाला आमदार सर्वश्री ॲड. निलय नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे,डॉ. अशोक उईके, नामदेव ससाने,संजीवरेड्डी बोदकूरवार तसेच प्रबोधिनीशी संबंधित असलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आभार श्रीमती चव्हाण यांची मानले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे दिनदयाल प्रबोधिनी परिसरात आगमन होताच शबरी अतिथीगृहासमोर पोलिस पथकाने मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी दिनदयाल प्रबोधिनीच्या मुख्य सभागृहातील पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व परिसरात वृक्षारोपण केले.

Copyright ©