Home महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी खाकीचा आभिमान बाळगावा-साहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी खाकीचा आभिमान बाळगावा-साहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत

33

 किनवट प्रतिनिधी

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी खाकीचा आभिमान बाळगावा-साहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत

राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी खाकीचा आभिमान बाळगावा.खाकी अंगावर घातली की देशाभिमानानेछाती फुगुन येते.तुम्हाला एनसीसी च्या माध्यमातून देशसेवा करण्यासाठी पूर्व शिक्षण मिळत आहे. या प्रशिक्षणाचा आपण निश्चितच जीवनात उपयोग करावा आसे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत यांनी बळीराम पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभाग ५२ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक शिबिरात त्यांनी व्यक्त केले.

दि. १५ नोंहेबरते २१ नोंहेबर २०२१ या काळात हे प्रशिक्षण संपन्न झाले. या शिबिराच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्था किनवट चे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, प्रमुख पाहुणे सावंत ,लाल मोहम्मद सुनील कुमार ,जोगेन्द्रसिंह ,लेफ्टनंट एस.एस.काझी,प्रा.राजकुमार नेम्मानीवार,कार्यालयीन अधिक्षक राजेन्द्र धात्रक हे विचार मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनुभव कथन परिश्रम व मेहनतीला महत्व कसे आहे. आसे अनेक उदाहरण देवून सांगितले.
या प्रसंगी सुषविन रमेश राठोड येथे आर्मी मध्ये सेवेत रूजु आसल्यामुळे त्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला. निलेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विशेष वार्षिक शिबिरात विविध स्पर्धेतून विजेत्यानां पदक व प्रमाणात देवून गौरव करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रफुल्ल राठोड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पंजाब शेरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ जी.एस.वानखेडे यांनी मानले.

Copyright ©