Home यवतमाळ नेताजी नगरवासियांची पालिकेत धडक.

नेताजी नगरवासियांची पालिकेत धडक.

35

नेताजी नगरवासियांची पालिकेत धडक.

प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.

लक्ष न दिल्यास प्रशासना विरुध्द आंदोलन करू – युवा जिल्हाध्यक्ष अश्वजित शेळके

यवतमाळ – स्थानिक नेताजी नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरातील विविध प्रकारच्या समस्या घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अश्वजित शेळके यांच्या नेतृत्वात यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना निवेदन देण्यात आली यावेळी प्रशासन लक्ष देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली गेल्या २५ ते ३० वर्षापासून प्रशासनाचे लक्ष नाही या भागात आजपर्यंत साधी नाली रस्ते लाईट पोल नाहीत शौचालयासाठी साधी सार्वजनिक शौचालय सुद्धा नाही शौच करण्यासाठी महिलांना अनेक परिस्थितीला सामोरे जावे लागते त्याठिकाणी नाली नसल्याने तेथील नागरिकांचे सांडपाणी रस्त्यावर येते आणि त्याच ठिकाणी साचून दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य या ठिकाणी निर्माण झाली असून त्या ठिकाणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आपण या भागात लक्ष घालून या ठिकाणी लवकरात लवकर मागण्या पूर्ण करून नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला प्रशासनाविरुद्ध आंदोलन करावे लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष अश्वजित शेळके यांनी प्रशासनाला दिला. यावेळी कुसुम ढगे नीलम जोगदंड पुष्पा लांडगे वैशाली लांडगे वैजयंता गाडी इंदू हिवराळे आरती गायकवाड विशाल गजभार रोहित वानखेडे दीपक ढगे अमित मुन धीरज शिरसाट सौरभ रामटेके आदी नागरिक निवेदन दिले.

Copyright ©