महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीच्या राज्य सचिव पदी विजयकुमार ठेंगेकर यांची निवड
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद समाविष्ठ ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीच्या राज्य सचिवपदी विजयकुमार ठेंगेकर याची निवड झाली आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
ग्रामपंचायत कर्मचारी संवर्गातून 10 % आरक्षणांतर्गत जिल्हा परिषद सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती वेतनासाठी सेवा जोडणी विषयक कामासोबतच त्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी ही कृती समिती कार्यरत आहे.
या कृती समितीची राज्यस्तरीय बैठक कल्याण , मुंबई येथे नुकतीच पार पडली. या सभेच्या अध्यक्ष स्थानी गिरीश दाभाडकर तर प्रमुख अतिथी म्हणून विलास कुमरवार, विनायक माने यांच्या समवेत 29 जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
या निवडीबद्दल विजयकुमार ठेंगेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
