Home यवतमाळ घाटंजी तालुक्यात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात युवासेना आक्रमक..!

घाटंजी तालुक्यात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात युवासेना आक्रमक..!

32

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

घाटंजी तालुक्यात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात युवासेना आक्रमक..!

घाटंजी – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुनजी सरदेसाई साहेब, यवतमाळ विस्तारक दिलीपजी घुगे यांच्या आदेशावरून पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवासेना आर्णी विधानसभा द्वारा आज घाटंजी शहरात सायकल रॅली काढून, शहरातील मुख्य बाजारपेठ व पोलीस स्टेशन चौकात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “बहोत हुई महंगाई की मार होश मे आवो मोदी सरकार” यासारख्या घोषनांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. वाढत्या पेट्रोल, डिझेल, घरघुती गॅस व ईतर महागाई मुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. इतिहासात कधी नव्हे ऐवढा महागाईने उच्चाक गाठला आहे, या महागाई मुळे सामान्य जनतेला जीवन जगने कठीन होवुन गेले आहे, आज युवासेना आर्णी विधानसभा द्वारे घाटंजी शहरात आक्रमक नारेबाजी करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश राठोड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, शहरप्रमुख मनोज ढगले, युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश राठोड, तालुका संघटक प्रशांत मस्के, तालुका प्रमुख राहुल आडे, शिवणी सर्कल प्रमुख पंकज ठाकरे, आदिवासी आघाडी तालुका प्रमुख विकास नैताम, अभय राठोड, उपतालुका प्रमुख मुकुंदा बुरकुंडे, शहर प्रमुख नुसरत खान, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख रोशन आडे, खुशाल पवार, कुर्ली शाखा प्रमुख भाऊ कुमरे, सतीष पेटकुले, झटाळा उपसरपंच रवी मसराम, सागर खडसे, शुभम विरदंडे, दिलीप राठोड, सतीष डहाके, नरेश गोडे, नितिन घरोडे, संदीप घराटे, दिनेश शेखापुरे, मारुती धुर्वे, पवन अलसपुरे, जीवन राठोड, महेश राठोड, प्रशिक ढोके ईत्यादी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©