Home Breaking News दिग्रस शहरात गर्दी च्या ठिकाणाचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास कपडा दुकानदारांने...

दिग्रस शहरात गर्दी च्या ठिकाणाचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास कपडा दुकानदारांने नोकरासाहित केली धक्काबुक्की

36

  संपादक सदानंद जाधव

दिग्रस शहरात गर्दी च्या ठिकाणाचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास कपडा दुकानदारांने नोकरासाहित केली धक्काबुक्की

निवासी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे कापड दुकानदारांकडून पायमल्ली

निवासी जिल्हाधिकारी ललित कुमार वर्हाडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) शस्त्रबंदी व जमावबंदी विरोधात दंडात्मक आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आला .असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र शहरात कच्छी चौक येथील भल्या मोठ्या कापडाच्या मॉलमध्ये बिना मास प्रचंड गर्दी होत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पत्रकार वृत्त संकलन करण्यासाठी गेले असता त्या दुकान मालकाने व दुकानातील नोकरांनि मिळून धक्काबुक्की करत दुकाना बाहेर ढकलून दिले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने समोरासमोर या व्यक्ती चे दुकाने व मॉल आहेत.या मॉल मध्ये महिला लहान मुले मोठ्या संख्येत बिना मास दिसून येत आहे.
दिग्रस शहरामध्ये सणासुदीच्या तोंडावर ब्रँडेड कापडाच्या नावाखाली सामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होऊन अवाच्या सव्वा भावाने ग्राहकांची लूट चालू आहे व कोरोना काळात गर्दी जमवून निवासी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे . व या मॉल मध्ये कापडावर होत असलेल्या किमतीमध्ये स्वतःच्या हाताने आकडा टाकून रेडिमेट कापड विक्रीचा अंधाधून धंदा शहरात जोमात चालू असून याकडे संबंधित प्रशासन लक्ष देतील का असा प्रश्न जनसामान्यातून केल्याजात आहे चढ्या भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची संबंधित प्रशासनाने चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यातून होत आहे

Copyright ©