Home यवतमाळ उद्यापासुन लागणार देविच्या दर्शनासाठी, भक्तांची रिघ..!

उद्यापासुन लागणार देविच्या दर्शनासाठी, भक्तांची रिघ..!

10

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

उद्यापासुन लागणार देविच्या दर्शनासाठी, भक्तांची रिघ..!

नियमांच्या चौकटीतच नवरात्रौत्सव; गरबा, दांडियाला बंदी

सध्यास्थितीमध्ये कोरोनाची लाट ओसरल्याने, येत्या (७आॅक्टो) गुरुवार पासून धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार राज्यसरकार करीत आहे. येत्या आठवड्यात नवरात्रीनिमित्त मोठी गर्दी होऊन पुन्हा कोरोना वाढू नये.
यासाठी मंदिरात प्रवेश करताना भक्तांना, कोरोना नियमावलिचे पालन करून, आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक असणार आहे.मगील दीड वर्षापासून शाळा,धार्मिक स्थळे, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमावर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बंदी होती. परंतु कोरोना रुग्ण कमी असल्याने, हळूहळू सर्व व्यवहार शिथिल करणे सुरू झाले.
उद्या दि.७ आॅक्टोंबर गुरुवार पासून जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला सर्वत्र प्रारंभ होत आहे. याच दिवशी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थले सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस मंदिरात नियमाचे पालन करूनच देवीचे दर्शन घेता येणार आहे. कोरोना संकटामुळे रास, गरबा व दांडिया या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कोवीड नियमाच्या निर्बंधातच नवरात्रोत्सव सण साजरा होणार आहे.
यावर्षी दि. ७ ते १५ आक्टोबर , दरम्यान नवरात्र, दुर्गापुजन व दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची ‘ लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून, उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. नवरात्रोत्सव साजरा करतांना, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.यासाठी प्रशासनाने निर्बंध घालुन दिले आहे.त्याप्रमाणे सोशलडिस्टंस, मास्कचा वापर, सॅनिटाजरचा वापर करणे आणी सार्वजनिक
नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी पोलिस प्रशासनाची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावे.नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळासाठी ४ फुट व घरगुती देवीची मूर्तीची उंची 2 फुट असावी ,विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्यास, कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यासाठी प्रशासनआपल्या दारी येत आहे. समन्वय ठेऊन गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये, त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयाजित करावी. देवी घटस्थापना व विसर्जनासाठी मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली आहे. शहरातीळ विविध मंडळांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रात्सवाचे कार्यक्रम घेतले जातात. दुर्गादेवी मूर्तीची उंची चार फुटापर्यंत असण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाला आळा घालण्यासाठी ,प्रशासनाला सहकार्य करावे,असे प्रशासनाकडुन वारंवार सांगण्यात येत आहे.

Copyright ©