Home यवतमाळ वणी शहरातील रोडवरील जीवघेनी खड्डे त्वरीत बुजविण्याची युवसेनीची मागणी.

वणी शहरातील रोडवरील जीवघेनी खड्डे त्वरीत बुजविण्याची युवसेनीची मागणी.

14

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश चौधरी

वणी शहरातील रोडवरील जीवघेनी खड्डे त्वरीत बुजविण्याची युवसेनीची मागणी.

कृषि उत्पन्न बाजार समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चिखलगाव बायपास पर्यंत पडलेली जीवघेणी खड्डे बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना प्रत्यक्षात दाखवुन उपाययोजनेची मागणी

वरोरा रेल्वे क्रॉसिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती, लोकमान्य टिळक महाविद्यालय, बस स्टॅन्ड ते चिखलगाव बायपास या रोडवरती अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेली आहे. या खड्ड्यामुळे रोज किरकोळ अपघात होत असतात. या संदर्भात बांधकाम विभागाला अनेकदा निवेदने दिली. परंतू मस्तवाल अधिकारी प्रशासनाची भुमिका घेतांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रतिदिन अपघात होत असतात.
वणी लालपुलीया ते मारेगांव रोड या आरव्हीसीएल च्या रोडवरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. रस्त्याच्या दुर्तफा झाडेझुडपे वाढलेले आहे. या कंपनीचे नियमानुसार ५ वर्ष पुर्ण झाल्याने त्यांनी त्या रोडचे डबल नुतनीकरण करुण काम पूर्ण करण्यात आले पाहिजे होते, परंतु आपणाकडून कोणतेही प्रशासकीय बाबीची पुर्तता करण्यात येत नाही वा खड्डे बुजविण्यात येत नाही यामुळे आपणाकडून दुर्लक्ष होत आहे. आणि अपघातामुळे लोकांना जीव गमवावे लागत आहे.या संदर्भात युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत आज दि. २८ सप्टेंबर रोजी तीन दिवसाच्या आत खड्डे बुझझविण्याची विनंती बांधकाम विभागाकडे केली आहे. अन्यथा रोजचे होणारे अपघात, लोकांचे जाणारे जीव यास जवाबदार धरून बांधकाम विभागा विरोधात कायदेशिर कार्यवाही का करण्यांत येऊ नये ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या संदर्भात बांधकाम विभागाचे उपअभियंता परळीकर यांना प्रत्यक्षात शहरातील रस्त्यावरील खड्डे दाखवून या बाबीचे गांभीर्य समजावून सांगितले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजू तुरणकर, अजिंक्य शेंडे, ललित लांजेवार, मंगल भोंगळे, जनार्दन थेटे, पियुष चव्हाण,ध्रुव येरने, सौरभ वानखेडे, चिखलगाव चे प्रदीप खेकरे उपस्थित होते.

Copyright ©