वणी तालुका प्रतिनिधी निलेश चौधरी
पंचनामे न करता अगदी सरसकट शेतकऱ्याना 100% नुकसान भरपाई देण्यात यावी
तालुक्यात सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेती पिकांची सरसकट नुकसान भरपाई मिळावी त्याचसोबत कापूस प्रति हेकटर 30 हजार रुपये व सोयाबीन 20 हजार रुपये हेक्टरि आर्थिक मदत मिळावी.पावसामुळे कापूस पिकावर विपरित परिणाम होत आहे हवेच्या प्रवाहामुळे कापसाचे झाड वारंवार जमिनीवर कोसळते त्यामुळे झाडाची मुळे तुटून झाड वारत आहे सततची फुलपाती गळणे,कापसाची बोंडे खराब होणे व फुटलेला कापूस ओलाचिंब होऊन जमिनीवर पळणे तीच परिस्थिती सोयाबीन पिकाची असून कापनीला आलेलं सोयाबीन अति पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम झालेला आहे
सततच्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन कापूस उत्पादनात अधिक प्रमाणात घट झालेली आहे व पिकाची प्रतवारी घसरत चाललेली आहे तेव्हा वरील विषयाच्या अनुषंगाने
कापूस व सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना कापूस हेक्टरी 30 हजार व सोयाबीन 20 हजार अशी सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी.याकरिता आज उपविभागीय अधिकारी वणी,तहसीलदार साहेब वणी,कृषी अधिकारी वणी व आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी राहुल खारकर,राहुल खिरटकर,आकाश सूर पवन मालेकर व वैभव गायकवाड हे उपस्थित होते.
