Home यवतमाळ अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल.

अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल.

12

माहूर प्रतिनिधी पदमा गिऱ्हे

अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल.

दोन दिवसाच्या संततधार पावसाने कोंब फुटल्यामुळे सोयाबिन पीक मातीमोल झाले आहे तर हवेमुळे कापसाचे झाड मुळातून खिळखिळ होऊन उन बोंडे काळी पडल्याने कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे माहूर तालुक्यातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतातूर झाला असून शासनाच्या मदतीकडे डोळे लाऊन बसला आहे.
माहूर तालुक्यातील माहूर,वानोळा,सिंदखेड व वाई बाजार या चारही परीमंडळात कुठे 30,कुठे 20 तर कुठे 15 मिमी पाऊस झाला असून सुमारे 34400 हेक्टर्सवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने सरसकट मदत करावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.
माहूर तालुक्यातील खरीप पिकांचे 55 टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविला आहे.जुलै/ऑगस्ट महीन्यात झालेल्या नुकसानीचे अनुदान प्राप्त झाले असून यावेळी जिरायती,बारामही व फळ पिकासाठी ठरवून दिलेल्या निकषांनुसार झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळणार असल्याची माहीती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली.

Copyright ©