जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या महिला कार्याध्यक्ष डॉ. रुपाली वि. गिरोलकर मदर टेरेसा सोशल अवार्ड पुरस्काराने सन्मानित
यवतमाळ– कॅलीफोर्निया पब्लीक युनिवर्सिटी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांचेशी सलग्न असलेल्या डी. के. इंटरनॅशनल रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने समता साहित्य अकादमी भारत यांचे वतीने हॉटेल हरदेव इंटरनॅशनल नागपूर येथे शिक्षक दिना निमित्य राष्ट्रीय शिक्षक दिन परिषद 2021 चे आयोजन दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. त्यात संपुर्ण देशभरातून उत्कृष्ट काम करणारे आदर्श शिक्षक, शेतकरी, साहित्यिक, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते व ईतर मंडळींना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा यथोचित सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. या प्रसंगी यवतमाळ येथील महाराष्ट्र प्रांतीक तैली महासभाचे महिला कार्याध्यक्ष, प्रसिद्ध व लोकप्रिय होमियोपॅथी तज्ञ डॉ. रुपाली विलास गिरोलकर यांनी केलेल्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून डॉ. रुपाली यांच्या सर्वोत्कृष्ट मदर टेरेसा सोशल अवार्ड हा सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय सल्लागार खा. रामदासजी तडस, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ खा. डॉ. विकास महात्मे, डॉ. जयप्रकाश दुबळे, सहसंचालक क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र, डॉ. देवानंद तांडेकर राष्ट्रीय अध्यक्ष समता साहित्य अकादमी इत्यादी मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
डॉ. रुपाली गिरोलकर यांना मदर टेरेसा सोशल अवार्ड मिळाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा व तेली समाज बांधवांच्या वतीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
