माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधामांना अविलंब फाशी द्या.राष्ट्रीय बंजारा परिषदेचा टाहो.
परभणी जिल्ह्यातील रेवानाईक तांडा डीघोळ येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आदर्श माणिक शिंदे, मयूर मुंजा मुठाळ, सुशील भागवत शिंदे या तिघांनी सामूहिक बलात्कार करून चित्रफीत बनविल्या प्रकरणी आणि सदरची बाब कुणाला सांगितली तर संपूर्ण कुटूंबालाच खतम करण्याची धमकी देवून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी तिन्ही नराधामांना त्वरित फांसीची शिक्षा द्या.अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेने केली आहे. तशा आशयाचे निवेदन दि.22 सप्टेंबर रोजी तहसिलदार माहूर यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनावर राष्ट्रीय बंजारा परीषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित राठोड, जिल्हा संघटक सुदर्शन नाईक, तालुका संघटक शिवचरण राठोड, साहेबराव जाधव, गोर सेनेचे अर्जुन पवार, भाजपा अनुसूचित जमातीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदोर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
.
