लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान
लाडखेड येथे जंतनाशक दिनाचे औचित्य साधून जंतनाशक मोहिमेचे उदघाटन
लाडखेड- जंतांच्या प्रादुर्भावामुळे मुलावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन दिनांक २१ सप्टेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून लाडखेड येथिल अंगणवाडी क्रमांक ६ येथे आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक मोहीम राबविण्याचे उद्घघाटन करण्यात.आले
जंत मुलावर काय परिणाम करतात. त्यापासून मुलांच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात ही बाब हेरून आरोग्य विभाच्या वतीने जंत नाशक औषधि वाटपा चे कार्य क्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी जंतनाशकावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. व उपस्थितांना जंत नाशक गोळ्या चे वाटप करण्यात आले कार्यक्रम येथील सरपंच माणिकराव चिरडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक पि. व्ही. नखाते, आरोग्य सेविका उज्वला बिजवे आरोग्य सेविका नीलिमा भेंड आशा सेविका योगिता श्रीनाथ,व रेखा कटारने अंगणवाडी सेविका रिता तायडे व आशा तायडे उपस्थित होते.
