आकोली प्रतिनिधी सचिन चावरे
पर्यटकांना सेल्फी ,पोहण्याचा नाद धरण प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष
पंचधारा डॅमवर कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी केली गर्दी
प्रशासनाच दुर्लक्ष
आकोली झडशी परिसरातील रिधोरा पंचधार धरण गत दहा दिवसापासून ओवर फ्लो ओसंडून वाहत आहे. जिल्हय़ात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे नंदी नाले आणि धरणाच्या जलपातळी मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणी ओसंडू वाहत आहे. हे दुष्य पाहण्यासाठी खूप दुरुन.. दुरुन पर्यटन बघण्यासाठी येतात. जिल्हय़ातील व बाहेरिल पर्यटन या स्थळी येत आहेत. यात हौशी पर्यटन सेल्फी आणी पोहण्याचा नाद करीत असतात. या पुर्वी सेल्फी च्या नादात अनेक जणांना मृत्यू झाला. आहे मात्र या धरणावर सुरक्षारक्षक नाही. प्रशासनाकडून कुठल्याही खबरदारी नसल्यामुळे पर्यटनकाची स्वतः खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जिल्हय़ात गत काही दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. या पाऊसामुळे नदी नाले भरल्यामुळे धरणाची जलपातळी वाढल्याने ओसंडू लागले आहे. तर काही धरण्याचे दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये आंनद व्यक्त होत आहे . आनंदाच्या भरात हौशी पर्यटक मंडळी हे दुष्य पाहण्यासाठी या स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यात त्याच्या कडून जिव घेण्या पध्दतीने सेल्फी काढण्यात येत आहे. धरण प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. मात्र धरण प्रशासनाकडून कुठल्याही सुरक्षा नसल्यामुळे येथे हौशी पर्यटनाकडून धोकादायक पद्धतीने सेल्फी काढला जात आहेत. याच नादात धरणावर या पुर्वी अनेक जणांना मृत्यू झाला आहे. तरी हौशी पर्यटक सेल्फी च्या नाद सोडायला तयार नाहीत सेल्फी चा नाद सोडायला तयार नही.सेल्फी काढणे धोकादायक ठरु लागले आहे पंचधारा धरणवर अनेक हवश्या ,गवश्या नवश्या चे प्रमाण वाढले असुन दुचाकी ,चारचाकी नी वर्धेसारक्या शहरातून हवशे नवशे येत असतात व परिसरातील गाव खेड्यातून हे येत असत्ताना भन्नाट वेगानी आपली वाहने चालवीत असतात व परिसरातील गावतील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . कोरोना काळा आधी या ठिकानी दामिनि पथकाच गस्त असायच मात्र आता पोलिस प्रशासनाच दुर्लक्ष होतांना दिसत आहे पंचधारा धरण सेलू पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असुन पोलिसांच या सर्व बाबींवर दुर्लक्ष होताना दिसत आहे.या वर पोलिस प्रशाशनानी लक्ष देण्याची गरज आहे.
