कार्यकारी संपादक राजू चव्हाण
राजुदास जाधव जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
———————————————-
घाटंजी-राज्यातील अग्रगण्य डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारी तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव पुरस्कार’ सहकार संत म्हणुन ओळख असलेल्या राजुदास जाधव यांना नुकताच औरंगाबाद येथील एका भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
राजुदास जाधव यांचे शैक्षणिक ,सामाजिक व सहकार क्षेत्रातिल योगदान उल्लेखनीय असून जागतिक दर्जाच्या फोर्ब्स या मासिकात त्यांच्या कार्याचा नुकताच गौरव झाला आहे.अखंड आयुष्यभर त्यांचे प्रबोधनाचे कार्य उत्तुंग दर्जाचे राहिले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन रयतेचा कैवारी या दैनिकातर्फे त्यांना २०२१ च्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
औरंगाबाद येथील मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या भव्य सभागृहात दैनिकाच्या द्वितीय वर्धापन दिनाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. अतिशय नेत्रदिपक ठरलेल्या या सोहळ्यात राजुदास जाधव यांना हा मानाचा पुरस्कार देऊन रयतेचा कैवारी या दैनिकाचे मुख्य संपादक शाहू संभाजी भारती व उपस्थित दिग्गज मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. योग्य व्यक्तीची निवड करून उचित गौरव झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्राचे माझी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे,आमदार निलेश लंके आदी मान्यवरांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कला,पर्यावरण,शिक्षण, सहकार तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी बजावणाऱ्या निवडक मान्यवरांना हा पुरस्कार दैनिकाच्या वतिने देण्यात येतो.पुसद येथील परशुराम नरवाडे या दाम्पत्याला सुद्धा गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन नामवंत पाहुणे तथा शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातुन शशीकांत खडसे,आसाराम चव्हाण, सुनील राठोड, दैनिक रयतेचा कैवारीचे जिल्हाप्रतिनिधी रवी आडे, वंदना जामगडे, शशिकांत जामगडे, कैलास चव्हाण व नागेश मिराशे उपस्थित होते. जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल यवतमाळसह संपुर्ण महाराष्ट्रभर राजुदास जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
“मला गौरविण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराचे खरे मानकरी माझ्या जिल्ह्यातील य.जि.प.प्राथ.शिक्षक संघटनेचे माझे शिलेदार असून हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो”राजुदास जाधव
