Home यवतमाळ किर्तनकारांना कलावंत मानधन निधी मिळावी वारकरी साहित्य परिषद, शाखा दिग्रसची निवेदनातून...

किर्तनकारांना कलावंत मानधन निधी मिळावी वारकरी साहित्य परिषद, शाखा दिग्रसची निवेदनातून मागणी

9

दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी वर्तमानपत्रामध्ये कलावंत मानधन यादी सादर करणे, यानुसार गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ या महामारीमुळे भजन,कीर्तन, प्रवचन या माध्यमातून होणाऱ्या समाज प्रबोधनाचे साप्ताहिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेअंतर्गत कीर्तनकारांना कलावंत मानधन निधी मिळावी,या मागणीचे निवेदन वारकरी साहित्य परिषद, शाखा- दिग्रसच्या वतीने तहसीलदार राजेश वजीरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

कलावंतांच्या नावाची यादी नसल्यामुळे त्यांच्या नावाची नोंद घेऊन आर्थिक मदत मिळावी.वारकरी साहित्य परिषद अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडे कलावंतांची यादी सादर करत आहोत.तसेच गेल्या काळात महाराष्ट्र शासनाने स्वच्छता अभियान राबविण्याचे कार्य हाती घेतले होते. मात्र कोविड-१९ मुळे ते होऊ शकले नाही.आम्हांला कलावंत निधीचा सन्मान मिळवून द्यावा.आणि महाराष्ट्र शासन यंत्रणेला ही कलावंतांची यादी सादर करण्यात यावी,असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे तालूकाध्यक्ष ह.भ.प श्री.जयराम महाराज गावंडे, माधव महाराज सोनोने, विष्णू महाराज गावंडे, अण्णा महाराज चिपडे, राजकूमार महाराज गावंडे,प्रभू महाराज ठाकरे,संतोष महाराज रणनवरे, सेवा महाराज चव्हाण उपस्थित होते.

Copyright ©