Home यवतमाळ आदर्श पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा गोदावरी अर्बंन घाटंजी शाखेने केला सन्मान

आदर्श पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा गोदावरी अर्बंन घाटंजी शाखेने केला सन्मान

9

घाटंजी:- भारतात प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपराआहे. शिक्षक हे आम्हांला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात,योग्य दिशेकडे वाटचाल करण्याकरीता प्रेरित करतात अशा उज्ज्वल पिढी घडविणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव सन्मान,मानपत्र व सत्कार गोदावरी अर्बनने आपल्या पाचही राज्यातील शाखा मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आला.
यावेळी घाटंजी शाखेच्या वतीने मधुसूदन चोपडे सर विष्णूपंत नामपिल्लेवार सर पुष्पा नामपिल्लेवार मॅडम नारायण भोयर सर हिरेश्वर येन्नरवार सर भूपेंद्र गोहणे सर गजानन बंडीवार सर गजानन उत्तरवार सर बाशा सर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.समाजिक भान असणाऱ्या घटकांचा सन्मान व्हावा या हेतूने गोदावरी अर्बन विविध अभिनव उपक्रम राबवित असते,आदर्श शिक्षकांचा सन्मान व्हावा या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला असून समाजातील प्रत्येक शिक्षक सन्मानजनक आहेत पण प्रतिनिधीक स्वरूपात काही शिक्षकांचा सन्मान गोदावरी अर्बनच्या वतीने करण्यात आला अशी प्रतिक्रिया संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी दिली आहे.याप्रसंगी शाखा व्यवस्थापक शैला गंपावार मॅडम अधिकारी चेतन पटेलिया सर केतकी कदम मॅडम सहाय्यक ऑफिसर निलेश होनाडे शुभांगी पुराणिक अंकित गुरनुले सब स्टॉप सचिन येन्नरवार निखिल वझलवार आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Copyright ©