बरबडा गावातील आदर्श युवक गौरव मनोहर राऊत यांनी २३ व्या वाढदिवसानिमित्त प्रयास वन येथे वृक्ष रोपण करून आणि वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय, यवतमाळ येथे रक्त दान करून वाढदिवस साजरा केला.
येणाऱ्या तरुण पिढी समोर एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत हे कार्य गौरव यांनी केले. १) लाल – रक्त, २) हिरवा – झाडे आणि ३) निळा – पाणी हे तीन रंग आपल्या जीवनात किती मोलाचे आहे. व त्या साठी आपल्याला पुढाकार घ्यायला हवा या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला व्रुक्ष लागवड आणि रक्त दान काळाची गरज आहे प्रत्येक तरुणांनी पुढाकार घेऊन असे कार्य सतत करावे असेही आवाहन त्यांनी केले
