Home Breaking News गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; सहा कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; सहा कोरोनामुक्त

31

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2151 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 26 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर सहा जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 391 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 389 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72840 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71044 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील एक व उमरखेड येथील एक अशा एकूण दोन महिला रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 16 हजार 339 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 43 हजार 52 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.17 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.51 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2151 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2151 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 22 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 765 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 754 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

कर्जवाटपाचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण करावे

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून द्यावा

शेतकऱ्यांना योजनांची माहिती देवून कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवावे

यवतमाळ दि. 26 ऑगस्ट : खरिप पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने 70 टक्के उद्दिष्टपुर्ती करून एकंदर चांगले काम केले असले तरी माहे ऑगस्टमधील संथ असलेले गती आता वाढवून पीक कर्ज वाटपाचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.

बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची माहे जून-2021 अखेरची त्रैमासिक आढावा सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी रिझर्व बँक नागपूरचे उमेश भन्साली, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभीये, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दीपक पेंदाम प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की बँकांनी पीक कर्जाव्यतिरिक्त शासनाच्या इतर कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देखील पुर्ण करण्यावर भर द्यावा. यासाठी शासनाच्या योजना राबविणाऱ्या संबंधीत जिल्हा समन्वयक यांनी उद्दिष्टापेक्षा दोन-तीन पट जादा लाभार्थीची निवड करावी व प्रलंबित प्रकरणात बँक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. बँकांनीदेखील त्यांच्या व्यावसाय प्रतिनिधी व बचत गटांमार्फत गावोगावीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे व त्यांना योजनांची माहिती देवून प्राधान्यक्रम क्षेत्रातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवावे.

रिझर्व बँकेचे भन्साली यांनी बँक धोरणानुसार बँकेकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्ज 15 दिवसात निकाली काढणे आवश्यक असल्याचे सांगितले.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तीमाहीत माहे जुन अखेर जिल्ह्यात प्राथमिक क्षेत्र अंतर्गत 4195 कोटी रुपये कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत रु. 1437 कोटी कर्ज वाटप करून 34 टक्के उद्दिष्टपुर्ती तर गैरप्राथमिक क्षेत्रात 418 कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत रु. 138 कोटी कर्ज वाटप करून 33 टक्के उद्दिष्टपुर्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये यांनी दिली. पीक कर्ज वाटपात पहिल्या तीमाहिमध्ये 46 टक्के तर आतापर्यंत 70 टक्के कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी शासनाच्या विविध योजनांची कर्ज प्रकरणे, पीक कर्ज योजना, मुद्रा लोन, पंतप्रधान स्वनिधी योजना, नाबार्ड योजना, स्वयंरोजगार, विविध महामंडळांचे कर्जाची प्रकरणे, बिजभांडवल योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना आदीबाबत बँकर्सच्या बैठकीत आढावा घेतला.

याप्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे तयार करण्यात आलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या सन 2021-22 च्या वार्षिक कर्ज आराखडा पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी अमोल येडगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पीक कर्जाचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल इंडियन ओव्हरसीज बँकेचे जिल्हा प्रबंधक रवी पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.

बैठकीला विविध विभागाचे विभागप्रमुख व बँकांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

Copyright ©