वणी पंचायत समिती वणी येथे मोटर वाहन नियम अंतर्गत कायदेविषयक शिबिर तालुका विधीसेवा समिती वनी व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा वतीने उपशाखा वनी यांचे संयुक्त मानाने कायदेविषयक शिबीर आयोजित केला होता सदर शिबिरला मुख्य अध्यक्ष हे न्यायमूर्ती श्री चापले व न्यायमूर्ती श्री बच्छाले साहेब तसेच कृषी अधिकारी आणि सर्व कोर्ट वनी येथील एडवोकेट व स्टाफ यांच्या माध्यमातून बी आर जी हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात पोलीस रहदारी नियंत्रण ऑटो रिक्षा चालक यांना वाहतूक सुरक्षा बाबत नियम सांगण्यात आले तसेच ट्रॅफिक नियम हे सर्वांना माहीत असले पाहिजे आणि लोकन्यायालय याबाबत तडजोड करून प्रकरण कसे लवकरात लवकर हाताळता येईल आणि कसा तडजोड शुल्क भरता येईल याबाबतची माहिती वनी येथील कार्यक्रमातील उपस्थित ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी आणि ऑटो रिक्षा चालक व अनुसूचित जाती जमाती यांच्या स्कीम बाबतची माहिती आणि अशा अनेक विषयावर माहिती सादर करून मोटार वाहन नियम अंतर्गत नियमन करणे या बाबत ची माहिती ऑटो रिक्षा चालक ट्रक चालक मोटार वाहन चालक व पादचारी यांना माहिती देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
