Home यवतमाळ आर्णी प्रेस क्लबची कार्यकारिणी गठीत

आर्णी प्रेस क्लबची कार्यकारिणी गठीत

7

 

( पदाधिकाऱ्यांची एकल संक्रमनिय मत पद्धतीने निवड )

जर्नलिस्ट वेलफेअर असोसिएशन द्वारा संचालित आर्णी प्रेस क्लबची कार्यकारिणी गठीत झाली असून प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी जाफर शेख, उपाध्यक्ष पदी आसिफ शेख व सचिन चहांदे व सचिव पदी आरिफ शेख यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ही निवड माहूर येथील सोनापिर बाबा यांच्या दर्गाह येथे एकल संक्रमनिय मत पद्धतीने घेण्यात आली.
आर्णी तालुक्यातील ग्रामीण व शहरी विभागाच्या समस्येला वाचा फोडण्यात सदैव अग्रेसर राहणाऱ्या जर्नलिस्ट वेलफेअर असोसिएशन द्वारा संचालित आर्णी प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक आज माहूर येथील सोनापिर बाबा यांच्या दर्गाह परिसरात पार पडली. आर्णी प्रेस क्लब मधील सदस्यांना एकल संक्रमनिय मत पद्धतीची ओळख व्हावी म्हणून पदाधिकारी यांची निवड एकल संक्रमनिय मत पद्धतीने घेण्यात आली. प्रेस क्लबच्या अध्यक्ष पदासाठी जाफर शेख, विनोद सोयाम, सचिन चहांदे व विशाल इंगोले यांनी नामांकन दाखल केले होते. एकूण बारा मतांपैकी जाफर शेख व विनोद सोयाम यांना प्रत्येकी पाच तर सचिन चहांदे व विशाल इंगोले यांना प्रत्येकी एक सदस्यांनी पहिली पसंती दर्शविली. पहिल्या पसंतीमध्ये ‘टाय’ झाल्याने दुसऱ्या पसंती नुसार जाफर शेख यांना सात मते तर विनोद सोयाम यांना पाच मते पडली. त्यामुळे जाफर शेख यांची अध्यक्षपदी निवड झाली. याच पद्धतीनुसार आरिफ शेख व सचिन चहांदे यांची उपाध्यक्षपदी तर आरिफ शेख यांनी सचिव पदी निवड करण्यात आली. यावेळी दीपक बुचेवाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली. तसेच माजी अध्यक्ष गणेश हिरोळे, उपाध्यक्ष नौशाद अली, सचिव विनोद सोयाम, रफिक सरकार, अक्रम सय्यद, राम होले, विशाल इंगोले, प्रशिक मुनेश्वर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Copyright ©