——————————————–
मांडवा येथे शेतकरी सुरक्षा किटचे वाटप
——————————————–
स्व.प्रविणभाई हेमराज गंडेचा मल्टीपरपज फाँउडेशन व जे बी क्राँप केअर अँड केमिकल चा उपक्रम
——————————————–
घाटंजी- तालुक्यात खरिप हंगामातील पिकांचे किड व्यवस्थापनाचे कामाला सुरवात झाली असतांना शेतकरी यावर्षी खरिपाच्या पिकांतून भरघोस उत्पादन काढण्यासाठी पिकांवर किटकनाशके फवारणी करीत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना शेतकरी सुरक्षा-कवच देण्याच्या उद्देशाने स्वं.प्रविणभाई गंढेचा मल्टीपर्पज फांऊंडेशन व जे बी क्राँप केअर अँड केमीकल्स च्या वतीने सयुंक्त विद्यमाने शेतकरी सुरक्षा-कवच म्हणजेच फवारणी किटचे वाटप तसेच गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून करण्यात आले व शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विषबाधा होऊ नये यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
खरिप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. तेव्हा मागणी दोन तीन वर्षात तालुक्यासह जिल्ह्यात फवारणी दरम्यान घडलेल्या विषबाधा प्रकरणामुळे यावर्षी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानातून नाविन्यपूर्ण माहिती व मार्गदर्शन करून दिलासा देण्यासाठी व फवारणी दरम्यान कुठल्याही बाधा घडू नये या उद्देशाने शेतकऱ्यांना फवारणी कशी करावी व या विषयावर स्वर्गीय प्रविणभाई हेमराज गंडेचा मल्टीपरपज फाँउडेशन घाटंजी व जे बी क्राँप केेअर अँँड केमीकल्स च्या वतीने मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षा किटचे वाटप मांडवा तालुका घाटंजी येथे करण्यात आले
यात संस्थेचे अध्यक्ष भावेश गंडेचा यांचे सहकार्य लाभले दिनेश गाऊत्रे एफ एम सी केमिकल कंपनी तालुका प्रतिनिधी यांचे हस्ते फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात विठ्ठल घरत यांनी फवारणी दरम्यान शेतकऱ्यांनी कुठल्या दक्षता बाळगणे गरजेचे आहे व कपाशी पिकांवर असणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी कशी करावी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विशेष सहकार्य संस्थेचे सचिव भावीका गंडेचा, हितेश गढिया, राजेंद्र गंडेचा, चेतन बोढे,रसिक उन्नरकर,भावेश अटारा, अनंत नखाते, धनंजय भोरे धनंजय वाघ कैलास कोरवते मनोज गवळी आशिष सावरकर, विनोद शिंदे,स्वप्नील गोडे मुरली, प्रविण चारमोडे सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात निशुल्क फवारणी किट व गुलाबी बोंड अळी बद्दल मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
