दिनांक 14 ऑगस्ट शनिवार रोजी अखंड भारत संकल्प दिवस निमित्त रामराज्य चौक , आर्णी प्रखंड येथे प्रभु श्री राम च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण प्रगट हनुमान मंदिर रामराज्य चौक येथे अखंड भारत संकल्प दिवस निमित्त भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आले. विश्व हिंदू परिषद चे जेष्ठ पदाधिकारी एवम मार्गदर्शक दीपक काका शहाणे, आजचे वक्ता बाबरी ढाचा उध्वस्त करून भारत मातेच्या माथ्यावर असलेले कलंक मिटवणाऱ्या कारसेवक मधील तालुक्यातील वीर बजरंगी कारसेवक विवेक दहिफळे यांनी संबोधन केले. आज च्या दिवशी अखंड भारताला खंडित करून भारताचे टुकडे केले 1947 ला पाकिस्तान व बांग्लादेश या आधी पन 1876 ला अफगानिस्तान,1904 नेपाल,1914 तिब्बत, 1937ब्रह्मदेश (म्यानमार) भूटान येवढे टुकडे भरताचे झाले पुनः खंडित भारताला अखंड भारत बनवायचे स्वप्न आहे तर हिन्दू युवकानी समोर येवुन देव, देश, धर्म साठी सामोर यावे व पुन्हा या भारत माता अखंड व्हावे या बाबत माहिती दिली व आपले आचरण कसे असावे या बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विहिंप आर्णी प्रखंड चे अध्यक्ष राजेश माहेश्वरी, तालुका सह कार्यवाह संकेत जी रेवनशेट्ये, नगर कार्यवाह व्यंकटेश इंदोरीया, बौद्धिक प्रमुख अजिंक्य सावळकर, प्रखर बजरंगी एवम मोठे बंधू गोपाल जी शर्मा, प्रखंड संयोजक सचिन मेसरे, नगर संयोजक अक्षय माहुरे, तसेच प्रखंड कार्यकारिणी, नगर कार्यकारिणी, विविध शाखेचे पदाधिकारी, विजय सिंह राठोड, विशाल देशमुख तसेच बजरंगदल चे सदस्य व मोठ्या संख्येने असलेल्या धर्मप्रेमी हिंदू नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आरती करून संपन्न करण्यात आला. कार्यक्रम चे सूत्र संचालन बजरंग दल जील्हा सह संयोजक सुशांत शुक्ला यांनी केले.
