तालुक्यातील केळझरा को. या गावाचे सरपंच रमेश चव्हाण यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये म्हसोला प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी यांचे कोवीड योध्दा म्हणून कोरोना काळात समाजसेवा हाच उदात्त हेतू ठेवून कोरोणा योध्दाचे महत्त्वपूर्ण कार्य प्रभावीपणे केले हे कार्य प्रेरणा देणारे असल्यामुळे व केळझरा को. या गावांमध्ये लसीकरणाचे सहा वेळा आयोजनात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली असल्यामुळे व गावाचे 80% लसीकरण पूर्ण झाल्यामुळे त्यांचा सत्कार घेण्यात आला सत्कारमूर्ती व्ही आर लसवंते आरोग्य सहाय्यक,एन आर देवस्थळे आरोग्य सेवक,व्हि के राठोड आरोग्य सेविका,आर भिसाडे ग्रा.आ.अधिकारी,कु.सोनल वाघाडे,तेजस लसवंते आपरेटर,के ए कांबळे आशासेविका यांचा सत्कार सरपंच रमेश चव्हाण, उपसरपंच सौ.सुनंदा राठोड, पोलीस पाटील वैभव कोट्टावार, ग्रामसेवक रेखा पैठणे, मुख्याध्यापिका सौ स्मिता कोट्टावार,शिक्षक रितेश काकडे,ग्रा.प.सदस्य विशाल कांबळे,सौ बेबी जाधव, सिंधु लाखे, सुनिता न्याती यांच्या हस्ते.प्रथम ध्वजरोहन करून कोवीड योध्द्याचा सत्कार समस्त ग्रामवाशी केळझरा को.याच्या उपस्थितीत पार पडला.
