जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन
यवतमाळ दि. 3 ऑगस्ट : कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोज विहित मुदतीत घेणे आवश्यक असल्याने पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सीन लसच्या दुसऱ्या डोजसाठी 28 दिवसानंतर तर कोविशिल्ड लसच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवस पुर्ण झाल्यानंतर संबंधीतांनी आपला दुसरा डोस प्राधाण्याने घ्यावा, असे आहवान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोव्हॅक्सीन लसचा दुसरा डोज घेण्यासाठी 28 दिवसांचा विहित कालावधी पुर्ण केलेले 117 हेल्थकेअर वर्कर, 507 फ्रंन्टलाईन वर्कर व 18 वर्षावरील 7920 नागरिक असे 8544 जण पात्र झाले आहेत तर कोविशिल्ड लसचा दुसरा डोज घेण्यासाठी 84 दिवसांचा कालावधी पुर्ण केलेले 4639 हेल्थकेअर वर्कर, 6190 फ्रंन्टलाईन वर्कर व 18 वर्षावरील 57492 नागरिक असे 68321 पात्र नागरिकांचा दुसरा डोज अद्याप प्रलंबित आहे. जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सीन व कोविशील्ड या दोन्ही लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून दुसऱ्या डोजसाठी पात्र झालेल्या नागरिकांकरिता लससाठा राखीव ठेवण्यात येत आहे. तरी पात्र नागरिकांनी तत्परतेने दुसरा डोज घेवून आपले लसीकरण पुर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
