Home Breaking News अल्हाज मौलाना कादर यांचा निधन.

अल्हाज मौलाना कादर यांचा निधन.

12

स्थानिक मुबारक नगर मदरसा दारुल उलूम मोहम्मदियाचे संस्थापक अल्हाज मौलाना अब्दुल कादर अब्दुल रशीद यांचे शुक्रवारी रात्री 10 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. मोहम्मदिया मदर्स्याची स्थापना 1975 साली झाली असून ते मदरसा आणि मशिदीत नियमित सेवा करत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मदरसा ची सेवा केली त्यांनी त्यांचें शेकडो अनुयायांना इस्लाम ची शिकवण दिली, त्यांच्या निधनामुळे आर्णी आणि संपूर्ण विदर्भातील इस्लामिक शिक्षण क्षेत्राचे खूप नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, नातवंडे आणि मोठा परिवार आहे. त्यांची अंतिमविधी आज सकाळी 11 वाजता नेर कब्रस्तान करण्यात आली. ज्यात यवतमाळ,अमरावती सह विदर्भातील असंख्य अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©